आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सच्या तेजीला लगाम, निफ्टीत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुंतवणूकदारांनी बँका आणि भांडवली वस्तू समभागांतून नफा वसुलीवर भर दिल्याने शुक्रवारी सेन्सेक्समध्ये किरकोळ घसरण झाली. सेन्सेक्सच्या सलग पाच सत्रांतील तेजीला यामुळे लगाम बसला. निफ्टीने मात्र आपला तेजीचा कल सुरू ठेवत वाढ नोंदवली.नफा वसुलीमुळे सेन्सेक्स ५.८३ अशा किंचित घटीसह २८,८७९.३८ वर आला. निफ्टीने २.०५ अंकांची वाढ साधत ८,७८०.३५ ही पातळी गाठली. जगातील बाजारातील तेजी आणि विदेशी गुंतवणूकदारांची खरेदी यामुळे घसरण मर्यादित राहिली.