आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेजीला नफारूपी विक्रीचे गालबाेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सकाळच्या सत्रातील खरेदीच्या झंझावाताला ग्रीसच्या पेचप्रसंगाने छेद दिला. ग्रीसचा नवा प्रस्ताव कर्जदारांनी नाकारल्यामुळे जगभरातील शेअर बाजारात नरमाईचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे कामकाजाच्या अखेरच्या अर्ध्या तासात झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स ७५ अंकांनी गडगडला. गेल्या नऊ दिवसांपासून बाजारातील तेजी मावळली.

ग्रीसच्या चिंतेबराेबरच फ्यूचर्स आणि आॅप्शन व्यवहारांची मुदत उद्या संपत असल्यामुळेदेखील बाजारात विक्रीचा मारा झाला; पण त्याअगाेदर जवळपास दिवसभर बाजारात सकारात्मक वातावरण हाेते. शेवटच्या अर्ध्या तासातील विक्रीनंतर २७,९४८.२४ अंकांच्या कमाल पातळीवरून जवळपास २०० अंकांनी घसरला हाेता.

सेन्सेक्स सकारात्मक पातळीवर उघडला. मान्सूनच्या चांगल्या प्रगतीमुळे बाजारातील खरेदीचा वेग कायम राहिल्याने सेन्सेक्सने २७,९४८.२४ अंकांची कमाल पातळी गाठली; परंतु जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे सेन्सेक्स खाली २७,६४७.२९ अंकांच्या पातळीवर आला. दिवसअखेर सेन्सेक्स ७४.७० अंकांनी घसरून २७,७२९.६७ अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत व्याजदर कपातीच्या हिंदाेळ्यावर झालेल्या खरेदीत सेन्सेक्सने १४३३.३९ अंकांची कमाई केली हाेती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकाने ८४०० अंकांची पातळी गाठली हाेती; परंतु नफारूपी विक्रीच्या मार्‍यात निफ्टी २०.७० अंकांनी घसरून ८३६०.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

विदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी ३७४.९७ काेटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, तर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ४०४.२० काेटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. ग्रीसचा प्रस्ताव कर्जदारांनी नाकारल्यानंतर युराेप बाजारात पडझड झाली. फ्रान्स आणि जर्मन बाजारातही नरमाई हाेती.

टाॅप लुझर्स
- हिंदाल्काे, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक, एनटीपीसी, सिप्ला, गेल इंडिया, भारती एअरटेल, टाटा माेटर्स.
- टाॅप लुझर्स : भेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, लुपिन, सन फार्मा, विप्राे, आयसीआयसीआय बँक.
बातम्या आणखी आहेत...