आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचा तीन आठवड्यांचा उच्चांक, व्याजदर कपात, अर्थसंकल्पातील अपेक्षांमुळे तेजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अर्थसंकल्पातील संभाव्य आर्थिक तरतुदी, रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कपातीची शक्यता यामुळे शेअर बाजारात बुधवारी तेजी आली. गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स १८४.३८ अंकांनी वाढून २९,३२०.३६ वर पोहोचला, तर निफ्टी ५९.७५ अंकांच्या कमाईसह ८,८६९.१० वर स्थिरावला. बाजाराने तीन आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. ग्रीसमधील संकटावर तोडगा निघण्याचे संकेत मिळाल्याने बाजारात उत्साह दिसून आला. देशातील संरक्षणविषयक उद्योगांच्या वाढीसाठी पावले टाकण्याचे संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिल्याने त्या कंपन्यांच्या समभागांवर उड्या पडल्या.

बाजारातील ब्ल्यू चिप कंपन्याच्या समभागांचीही जोरदार खरेदी झाली. एचडीएफसी, टाटा पॉवर, टीसीएस, महिंद्रा अँड महिंद्रा आदी समभाग चमकले. ग्रीस युरोझोनमधून बाहेर पडण्याची भीती कमी झाल्याने युरोपातील प्रमुख बाजारांत तेजी दिसून आली. आशियातील प्रमुख बाजारांतही तेजीचे वातावरण होते. तेजीने ब्ल्यू चिप निर्देशांक सहा दिवसांत १,०९२.८४ अंकांनी वधारला आहे.

मिड कॅपवर उड्या
गेल्या काही महिन्यांपासून बाजारातील स्मॉल तसेच मिड कॅप कंपन्यांच्या समभागांवर गुंतवणूकदार फिदा आहेत. बुधवारी स्मॉल कॅप निर्देशांक १.०४ टक्क्यांनी, तर मिड कॅप निर्देशांक ०.८४ टक्क्यांनी वधारले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांनी या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात खरेदी केले.

युरोपातून दिलासा
कच्च्या तेलाच्या घसरणाऱ्या किमती आणि युरोझानमधील ग्रीस संकटावर तोडगा निघण्याचे संकेत यामुळे बाजारात उत्साह दिसून आला. अर्थसंकल्पामुळे बाजारातील वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलिओ.