आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्समध्ये १५१ अंकांची वाढ; जागतिक पातळीवरील सकारात्मक घडामोडींचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जागतिक पातळीवरील सकारात्मक घडामोडी आणि सेवा क्षेत्राच्या कामगिरीत झालेली वाढ यामुळे पुन्हा एकदा बाजारात उत्साह निर्माण झाला. त्यामुळे एक दिवसाच्या घसरगुंडीनंतर बाजारात झालेल्या चौफेर खरेदीच्या सपाट्यात सेन्सेक्समध्ये १५१.१५ अंकांची वाढ होऊन २८,२२३.०८ अंकांच्या दोन आठवड्यांच्या कमाल पातळीवर गेला. माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी आली.

बाजारात सातत्याने विदेशी निधीचा ओघ असल्यामुळे बाजाराच्या उत्साहात अाणखी भर पडली. रिअॅल्टी क्षेत्रात सुधारणा होत असल्यामुळे या समभागांबराेबरच माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि वाहन कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी येऊन सेन्सेक्सला उच्च पातळी गाठता आल्याचे मत रेलिगेअर सिक्युरिटीजचे किरकोळ वितरण प्रमुख जयंत मांगलिक यांनी व्यक्त केले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८,१३८.०४ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. प्रारंभीपासूनच जोरदार खरेदी असल्यामुळे सेन्सेक्सची भक्कम पातळी कायम होती, परंतु नंतर सेन्सेक्स काहीसा घसरला. तरीही दिवसअखेर १५१.१५ अंकांनी वाढून सेन्सेक्स २८,२२३.०८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ५१.०५ अंकांनी वाढून ८५७.९५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.