आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर, सुधारणांच्या अाशेवर बाजारात उसळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मंगळवारच्या अापटीनंतर बाजारातील वातावरण सकारात्मक हाेण्यासाठी अनेक घडामाेडी कारणीभूत ठरल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अार्थिक सुधारणांची गाडी रुळावर येण्याची बाजाराला अाशा वाटू लागली अाहे. त्यातच मान्सूनची प्रगती चांगली हाेत असल्याने व्याजदर कपातीचीही शक्यता निर्माण झाली. या सगळ्या अपेक्षांच्या हिंदाेळ्यावर बाजारात तुफान खरेदी हाेऊन सेन्सेक्सने ३२३ अंकांची उसळी मारली. गेल्या तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर सेन्सेक्स बंद झाला.

अाैषध क्षेत्रातील अग्रणी सन फार्मा कंपनीने नफा अाणि महसुलाबाबत दिलेल्या नकारात्मक संकेतांमुळे या समभागाला मार खावा लागला हाेता. परंतु बुधवारी मात्र सन फार्मासह विक्रीचा ताण अालेल्या अन्य समभागांची चांगली खरेदी झाली. जिअाेजित बीएनपी परिबासचे तांत्रिक संशाेधन सहप्रमुख अानंद जेम्स यांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी बाजारात माेठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीच्या माऱ्यात अनेक बड्या कंपन्यांच्या समभाग किमती घसरल्या. गुंतवणूकदारांनी या घसरणीचा फायदा घेऊन मूल्याधिष्ठित खरेदी करण्यावर भर दिला. त्यातून भूसंपादन विधेयकात सुधारणा करण्याच्या प्रस्तावामुळे राज्यांना अाणखी लवचिकता मिळण्याची शक्यता अाहे. हे विधेयक अाणखी अनुकूल हाेण्याच्या अपेक्षेचादेखील बाजाराला फायदा झाला.

संसदेच्या वरच्या सभागृहाने जीएसटी विधेयकाबाबतचा अहवाल देण्यासाठी निवड समितीचा विचार केल्यामुळेही बाजाराला माेठा अाधार मिळाला. मान्सूनने चांगली प्रगती केली असून कच्च्या तेलाच्या किमतीही कमी झाल्या अाहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करण्याच्या अाशा उंचावल्या अाहेत.
राजकीय इच्छाशक्ती
सकाळच्या सत्रात झालेल्या विक्रीमुळे सेन्सेक्सला काहीसा धक्का बसला, परंतु नंतर झालेल्या खरेदीमध्ये सेन्सेक्स दिवसअखेर ३२२.७९ अंकांनी वाढून २८,५०४.९३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक १०४.०५ अंकांनी वाढून ८६३३.५० अंकांच्या पातळीवर बंद झाला. वस्तू अाणि सेवा कर तसेच भूसंपादन विधेयकातील अडचणी साेडवण्याबाबत राजकीय इच्छाशक्ती असल्याचे संकेत सरकारकडून मिळाल्यामुळे बाजाराला प्रामुख्याने माेठा दिलासा मिळाला.