Home | Business | Share Market | sensex raised by 83 points and nifty down by 42 points

अर्थसंकल्पातील संभाव्य अपेक्षांनी बाजार वधारला; सेन्सेक्समध्ये 83 अंकांची वाढ, तर निफ्टीत 42 अंकांची घसरण

वृत्तसंस्था | Update - Jan 24, 2017, 03:00 AM IST

आशियाई बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतानंतरही सोमवारी भारतीय बाजारात तेजी नोंदवण्यात आली.

 • sensex raised by 83 points and nifty down by 42 points
  मुंबई - आशियाई बाजारातून मिळालेल्या नकारात्मक संकेतानंतरही सोमवारी भारतीय बाजारात तेजी नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ८३ अंकांच्या वाढीसह २७११७ अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ४२ अंकांच्या तेजीसह ८३९१ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉक्सपैकी ३४ स्टॉक्स वाढीसह तर १६ स्टॉक्स घसरणीसह बंद झाले.

  अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाकडे बाजाराने दुर्लक्ष केले. नीचांकी पातळीवर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी नोंदवण्यात आली तसेच आगामी अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची बाजाराला आशा असल्यामुळे बाजारात वाढ दिसून आली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतीय बाजारात दिवसभराच्या व्यवहारादरम्यान काही कंपन्यांच्या शेअरमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्तीची तेजी नोंदवण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या व्यवहारात सर्वात जास्त खरेदी मेटल क्षेत्रातील शेअरमध्ये नोंदवण्यात आली. निफ्टी मेटल निर्देशांक सर्वाधिक तेजीसह ३,०१३,.५० अंकांच्या पातळीवर बंद झाला. सुरुवातीच्या व्यवहारात फार्मा कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा मारा दिसून आला, तर निफ्टी फार्मा निर्देशांक ०.९१ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

  ट्रम्प यांचा परिणाम
  अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रान्स-पॅसिफिक पार्टनरशिपमधून दूर होण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे जपान तसेच ऑस्ट्रेलियाच्या शेअरमध्ये घसरण नोंदवण्यात आली. यामुळे जपानच्या निक्केईमध्ये १.१ टक्के, तर ऑस्ट्रेलियातील शेअर बाजारामध्ये ०.७ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. जपान आणि ऑस्ट्रेलियासह १२ देशांनी या व्यापारी करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

  रुपया मजबूत
  डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये मजबुती आली असून रुपया १३ पैशांच्या मजबुतीसह ६८.०५ वर उघडला. डॉलरच्या निर्देशांकामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे रुपयासह काही देशांच्या चलनाच्या मूल्यामध्ये वाढ नोंदवण्यात आली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Trending