आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Rallies For 4th Day In A Row, Ends 39 Points

बँकांच्या निर्देशांकांत सर्वाधिक 3.28% वाढ, सेन्सेक्स 39, तर निफ्टीत 10 अंकांची वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्यातीलव्यवसायाच्या शेवटच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आला. शुक्रवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स ३९ अंकांनी वाढून २४,६४६ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला निफ्टी १० अंकांच्या वाढीसह ७४८५ च्या पातळीवर बंद झाला. विशेष म्हणजे दिवसभराच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ सरकारी बँकांच्या शेअरमध्ये नोंदवण्यात आली.

भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सरकारी बँकांच्या निर्देशांकांत सर्वात जास्त ३.२८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. निर्देशांकांत समावेश असलेल्या सर्व शेअरमध्ये १.५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली. यातील सर्वात जास्त वाढ सिंडिकेट पीएनबीमध्ये झाली असून शेअर ७.१९ टक्क्यांनी वाढून बंद झाले. इलाहाबाद बँक आणि ओबीसी पीएनबीमध्ये पाच टक्क्यांची वाढ दिसून आली. आवश्यकता भासल्यास सरकारी बँकांना जास्त मदत दिली जाणार असल्याचे अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितल्यानंतर सरकारी बँकांच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली आहे. मेटल निर्देशांकातही १.७७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून यात सर्वाधिक ३.८१ टक्के वाढ वेदांतामध्ये नोंदवण्यात आली आहे.

मिडकॅप शेअरमध्ये तेजी
दिवसभराच्याव्यवहारात भारतीय शेअर बाजारात मिडकॅप शेअरमध्ये सलग वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजरातील मिडकॅप निर्देशांक एक टक्क्यापेक्षा जास्त या वाढीसह बंद झाला. निर्देशांकात समावेश असलेल्या इंडियन बँकेमध्ये ९.३४ टक्के, एबीबीमध्ये सहा टक्के आणि ओबीसीमध्ये ५.८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली, तर स्मॉलकॅप निर्देशांकात ०.७४ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.