आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांमध्ये उत्साह; शेअर बाजारात तेजी, निफ्टीत ६४ अंकांची वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इन्फोसिसची आकडेवारी चांगली अाल्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आणि देशांतर्गत बाजार दिवसभराच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १९० अंकांच्या वाढीसह २५,८१६ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ६४ अंकांच्या वाढीसह ७९१५ च्या पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात इन्फोसिसचे शेअर ५.५ टक्क्यांनी वाढून १२३७ रुपयांच्या भावावर बंद झाले. तर इंट्राडेमध्ये स्टॉक्स सात टक्क्यांच्या वाढीसह आपल्या सर्वोच्च पातळीवर (ऑल टाइम हाय) १२६७ रुपयांवर पोहाेचले.
राष्ट्रीय शेअर बाजारात बँकिंग आणि ऑटो क्षेत्र सोडले तरी इतर सर्वच क्षेत्रांत तेजी नोंदवण्यात आली. बँक िनफ्टी ०.३४ टक्क्यांच्या घसरणीसह १६२२२ वर बंद झाला. तर ऑटो निर्देशांक ०.१६ टक्क्यांच्या घसरणीसह ८३८६ च्या पातळीवर बंद झाला. आयटी निर्देशांक २.१६ टक्क्यांच्या वाढीसह ११,५९७ वर बंद झाला. एफएमसीजी आणि मेटल निर्देशांकात एक टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० स्टॉक्सपैकी ३० स्टॉक्स मध्ये तेजी नोंदवण्यात आली आहे. तर २० स्टॉक्स घसरणीसह बंद झाले. दिवसभराच्या व्यवहारात सर्वात जास्त तेजी नोंदवणाऱ्या स्टॉक्समध्ये इन्फोसिस, आयडिया, बीपीसीएल, अल्ट्राटेक आणि इन्फ्राटेल यांचा समावेश आहे. हे सर्वे स्टॉक्स २.५ टक्के ते ५.५ टक्क्यांनी वाढून बंद झाले.
चांगली सुरुवात
सध्या तिमाही आकडेवारी जाहीर होण्यास सुरुवात झाली असून इन्फोसिस आणि डीसीबी बँकेची आकडेवारी चांगली राहिली आहे. ही एक चांगली सुरुवात असल्याचे मत बोनांझा पोर्टफोलिओचे पुनीत किनरा यांनी सांगितले. सध्या तरी बाजार सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.
बातम्या आणखी आहेत...