आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sensex Reclaims 26000 To End Near Four month High

बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्समध्ये 328, तर निफ्टीमध्ये 108 अंकांची वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मेटल स्टॉक्ससह मारुती सुझुकीची आकडेवारी अंदाजापेक्षा चांगली अाल्यामुळे ऑटो क्षेत्रामध्ये आलेल्या जोरदार तेजीनंतर भारतीय शेअर बाजारात दिवसभराच्या उच्चांकी पातळीवर बंद झाले. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३२८ अंकांच्या वाढीसह २६००७ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ७९६२ च्या पातळीवर बंद झाला.

राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्वच क्षेत्रांत जोरदार खरेदी दिसून आली. सर्वात जास्त वाढ मेटल क्षेत्रातील शेअरमध्ये नोंदवण्यात आली. मेटल क्षेत्रातील निर्देशांक दोन टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह बंद झाला. हिंडाल्कोमध्ये सुमारे पाच टक्के, वेदांता आणि भूषण स्टीलमध्ये सुमारे चार टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. मंगळवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारादम्यान राष्ट्रीय शेअर बाजारातील बँक निर्देेशांक सुमारे दोन टक्क्यांच्या वाढीसह १७ हजारांच्या पातळीच्या वरती गेला. सर्वात जास्त वाढ इंडसइंड बँकमध्ये दिसून आली. यातील शेअर सुमारे चार टक्क्यांनी वाढले. तर यस बँक, कॅनरा बँकमध्ये ३.५ टक्क्यांची वाढ झाली.
राष्ट्रीय शेअर बाजारात ऑटो क्षेत्रात मंगळवारी सुमारे १.५ टक्क्याची वाढ झाली. निर्देशांकात समावेश असलेल्या १६ शेअरपैकी १५ शेअर वाढीसह बंद झाले. मारुती आणि टाटा मोटर्स डीव्हीआरमध्ये ३ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली. बॉश, एक्साइड इंडस्ट्रीज, टीव्हीएस मोटर्स, अमरा राजा बॅटरीजच्या शेअरमध्ये दाेन टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.

अमेरिकेची सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हची बैठक सुरू झाली असून या बैठकीच्या निर्णयाकडे बाजाराचे लक्ष असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, निफ्टीतील 45 स्टॉक्समध्ये खरेदी