आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स १६१ अंकांनी वाढून २५,७७८ वर बंद, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बाजाराला आश्चर्यकारक धक्का देत रेपो रेटमध्ये ०.५० टक्क्यांची कपात केली. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. मंगळवारी सकाळी खराब संकेतांमुळे देशातील बाजाराची सुरुवात निराशाजनक झाली होती. मात्र, सकाळी ११ वाजता रिझर्व्ह बँकेने व्याजदराची घोषणा झाल्यानंतर बाजारात सुधारणा दिसून आली.
सेन्सेक्स दिवसभराच्या २५२८७.३३ या नीचांकी पातळीवर गेला होता. तो २६०५४.३७ च्या सर्वोच्च पातळीवर गेला. शेवटी सेन्सेक्समध्ये ०.६३ टक्क्यांची वाढ होऊन २५,७७८ च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी ०.६१ टक्क्यांच्या वाढीसह ७८४३ वर बंद झाला.

जागतिक बाजारातील खराब संकेतांमध्ये भारतीय बाजारातदेखील सुरुवातीला पडझड झाली होती. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर सेन्सेक्समध्ये सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली. तसेच निफ्टीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. दिवसभराच्या व्यवहारात बँक निफ्टी तीन टक्क्यांनी कमी झाला होता. नंतर मात्र त्यात अर्धा टक्क्याची वाढ नोंदवण्यात आली. तर ऑटो आणि रिअॅल्टी इंडेक्समध्ये एका टक्क्यापेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच अर्ध्या टक्क्याने कपात झाल्यामुळे बाजारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.