आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात पडझडीनंतर पुन्हा उसळीची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात निफ्टीने ८५२५ अंकांची पातळी पार केल्यानंतर शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये उसळी दिसून आली. निफ्टी ८६४६.७५ च्या सर्वोच्च पातळीवर गेला होता. वास्तविक पाहता शेअर बाजारातील स्थिती नकारात्मक आहे. व्यवहारातील घटीत वाढ झाली आहे. निर्यातीतही सलग घट होत आहे. मात्र, बाजारात नगदी वाढल्यामुळे उसळी दिसून आली. त्यामुळे मूळ कारणांकडे बाजाराने डोळेझाक केली.

जागतिक पातळीवरील कारकदेखील गेल्या आठवड्यात कमजोर होते. मात्र, आता त्यात सुधारणा होत असून जगभरातील शेअर बाजारांत सकारात्मकता दिसून येत आहे. एकूणच शेअर बाजाराच्या बाबतीत मागील आठवडा चांगला होता. मंगळवारी यामध्ये थोड्याफार प्रमाणात पडझड झाल्यानंतर बाजार बंद झाला. ही पडझड सन फार्माच्या वतीने खराब स्थितीचा इशारा दिल्यामुळे झाली. कंपनीचे शेअर १५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीत बंद झाले. ही एका दिवसातील कंपनीची सर्वात मोठी पडझड ठरली.

सन फार्माच्या वतीने सांगण्यात आले अाहे की, रॅनबॅक्सीच्या अधिग्रहणाचा परिणाम चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा मारा दिसून आला. पडत असलेल्या बाजाराला इन्फोसिसच्या वतीने मदत मिळाली. इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षात महसुलातील वाढीचा अंदाज एप्रिलमध्ये ६.२ ते ८.२ टक्क्यांवरून वाढून ७.२ ते ९.२ टक्के केला आहे. यामुळे इन्फोसिससह इतर आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली. एचसीएल टेकचे शेअर ४.२८ टक्के, विप्रोचे शेअर २.५ टक्के वाढीसह बंद झाले. टेक महिंद्रामध्येही २.९ टक्के वाढ झाली.

पुढील काळात प्रमुख बाजारांमध्ये सुरुवातीला पडझड दिसण्याची शक्यता आहे. निर्देशांकात स्थिरता येण्याआधी त्यात थोडी पडझड दिसण्याची शक्यता आहे. निफ्टीला पुढील दोन-तीन सत्रांत ८४२३ अंकांच्या जवळ आधार मिळण्याची शक्यता आहे. जर निफ्टीचा आधार या पातळीवर कायम राहिला तर तो येथे स्थिरावण्याची शक्यता आहे. मात्र, जर निफ्टीने ही पातळी तोडली तर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत निफ्टी ८३१३ अंकांच्या खाली येण्याची शक्यता आहे. सध्या तरी हा मजबूत आधार असल्याचे मानले जाऊ शकते.

वरच्या पातळीचा विचार केल्यास निफ्टीला वरती ८६३८ अंकांच्या जवळपास मजबूत आधार मिळण्याची शक्यता आहे. निफ्टीने ही पातळी ओलांडली तर आणखी ८० अंकांची वाढ होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्याला पुढचा आधार ८७१६ अंकांच्या जवळ मिळण्याची शक्यता आहे.
शेअरच्या बाबतीत या आठवड्यात इंडियन अॉइल कॉर्पोरेशन आणि गेल इंडिया चांगल्या स्थितीत दिसत आहेत. आयअोसीचा सध्याचा बंद भाव ४३८.६५ रुपये असून त्याचे पुढील लक्ष्य ४४४ रुपये तर कमीत कमी ४३१ रुपये आहे. गेल इंडियाचा सध्याचा बंद भाव ३६५ रुपये, पुढील लक्ष्य ३७१ रुपये, तर कमीत कमी ३५८ रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dbcorp.in