आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील पडझडीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 230, निफ्टीत 72 अंकांची वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शेअर बाजारात सलग ३ दिवसांपासून सुरू असलेल्या पडझडीला गुरुवारी ब्रेक लागून सेन्सेक्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्स २३० अंकांनी वाढून २७,०१० च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी ७२ अंकांनी वाढून ८१८० च्या पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० शेअरमधील २२ शेअर वाढीसह बंद झाले. यामध्ये सर्वात जास्त वाढ ही टाटा माेटर्सच्या शेअरमध्ये नोंदवण्यात आली. टाटा माेटर्सच्या शेअरमध्ये ७.९६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून दबाव होता. मात्र, गुरुवारी शेअर बाजारात देशांतर्गत आणि जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाले. त्यामुळे खरेदीत वाढ झाली. युराेपियन बाजारात जवळपास १ टक्क्याची वाढ नोंदवण्यात आली, तर एशियन बाजारामध्येदेखील गुरुवारी तेजी दिसून आली. याबरोबरच मिडकॅप कंपन्यांची जाहीर झालेली आकडेवारी चांगली राहिली. त्यामुळेदेखील शेअर बाजाराला फायदा झाला. दोन ते तीन दिवसांपासून बाजारातील स्थिती सकारात्मक होत आहे. त्यामुळे गुरुवारी रेंजबाउंड दिसून आला. निफ्टीलादेखील ८१०० वर चांगला आधार असल्याचे मत मायस्टॉक रिसर्चचे प्रमुख लोकेश उप्पल यांनी व्यक्त केले. निफ्टीला ८२०० च्या जवळपास रेजिस्टन्स राहील, असेही त्यांनी सांगितले.