नवी दिल्ली- भारतीय शेअर बाजारात शेवटच्या तासात झालेल्या खरेदीमुळे थोडी रिकव्हरी झाली असली तरी व्यवहाराच्या शेवटी बाजार घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २०१ अंकांच्या घसरणीसह २६,५२५ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ६६ अंकांच्या घसरणीसह ८१४१ च्या पातळीवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजारात सार्वजनिक क्षेत्रातील बँका तसेच मेटल निर्देशांक सोडला तर सर्व इतर सर्व क्षेत्रांतील निर्देशांक घसरणीसह बंद झाले. बँक निफ्टी १.५ टक्क्याच्या घसरणीसह १७६६६ वर, तर आर्थिक सेवा निर्देशांकात १.१० टक्क्याच्या घसरणीसह ७१४४ च्या पातळीवर बंद झाला. मेटल निर्देशांक ०.७० टक्क्यांच्या वाढीसह २१३२च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये समावेश असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निर्देशांक ०.४१ टक्क्यांच्या वाढीसह २६४४ च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये समावेश असलेल्या ५० पैकी ३८ स्टॉक्समध्ये तेजी नोंदवण्यात आली.