आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sensex Soars 445 91 Points To End At 28978 02 Nifty Surges 133 35 Points To Close

शेअर बाजार अठरा महिन्यांच्या उच्चांकावर, सेन्सेक्स 446, निफ्टीत 133 अंकांची वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विदेशी बाजारातून तसेच देशांतर्गत अर्थव्यवस्थेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीवर बंद झाले. मंगळवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४४६ अंकांनी वाढून २८९७८ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १३३ अंकांनी वाढून ८९४३ च्या पातळीवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे भांडवली मूल्य आतापर्यंतच्या नव्या विक्रमी पातळीवर पोहाेचल्यामुळेच बाजारात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवण्यात आली आहे. मार्केट कॅप ११२ लाख कोटी रुपयांच्या वरती बंद झाला आहे. मंगळवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात सर्वात जास्त वाढ बँक आणि ऑटो क्षेत्रात दिसून आली आहे. यामध्येदेखील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सर्वात चांगली वाढ मिळवली आहे. या क्षेत्रातील निर्देशांक दोन टक्क्यांनी वाढून बंद झाला.

मार्केट कॅप विक्रमी पातळीवर
>मुंबई शेअरबाजारातील लिस्टेड कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप नव्या विक्रमी पातळीवर पोहाेचला आहे.
>दुपारनंतर मुंबईशेअर बाजारातील मार्केट कॅप ११२.१४ लाख कोटी रुपयांच्या वर गेला.
>शुक्रवारी मुंबईशेअर बाजारातील मार्केट कॅप १११ लाख कोटी रुपयांच्या वरती बंद झाला होता.
>मुंबई शेअरबाजारातील १७० पेक्षा जास्त स्टॉक्स वर्षभरातील उच्चांकी पातळीवर पोहाेचले आहेत.
>विक्रमी पातळीवरपोहाेचलेल्या स्टॉक्समध्ये एस बँक, यूफ्लेक्स, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयटीसी यांचा समावेश आहे.

शेअर बाजरातील तेजीची कारणे
अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी खराब आल्यामुळे फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात वाढ होण्याची शक्यता कमी झाली आहे. युरोपियन तसेच आशियाई बाजारातील वाढीचाही भारतीय बाजारावर परिणाम झाला. देशाच्या अर्थव्यवस्थेतून सकारात्मक संकेत मिळाल्याचाही बाजारावर परिणाम झाला आहे. आॅगस्ट महिन्यात पीएमआय इंडेक्समध्ये वाढ झाल्यामुळे अर्थव्यवस्थेतील तेजीची अपेक्षा वाढली आहे. रिझर्व्ह बँकेच्या वतीने व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे. ऑगस्ट महिन्यात गुंतवणूकदारांनी बाजारातील गुंतवणूक वाढवली आहे. जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील विश्वास वाढला आहे.
बातम्या आणखी आहेत...