आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स 777 अंकांनी वाढला, 7 वर्षांत एकाच दिवसातील वाढीचा हा उच्चांक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सचा मंगळवारी ७ या आकड्यावर चांगलाच जीव जडला. सेन्सेक्सने ७७७ अंकांची दणकट उसळी घेतली. गेल्या ७ वर्षांत एकाच दिवसातील वाढीचा हा उच्चांक आहे. अर्थसंकल्पात सरकारच्या आर्थिक उपायांच्या घोषणेमुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते. याचाच फायदा सेन्सेक्सला झाला.
३० शेअर असलेला बीएसई सेन्सेक्स मंगळवारी ७७७.३५ अंक वा ३.३८ टक्क्यांनी वधारून २३,७७९.३५ अंकांवर बंद झाला. यापूर्वी सेन्सेक्सने १८ मे २००९ रोजी एका दिवसातील सर्वात मोठी म्हणजे २,११०.७९ अंकांची उसळी घेतली होती. सेन्सेक्समधील ३० पैकी २७ शेअर्स फायद्यात राहिले. एफएमसीजीमध्ये ४.९० टक्क्यांची वाढ झाली. साेमवारी सेन्सेक्स १५२.३० अंकांनी कोसळला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २३५.२५ म्हणजेच ३.३७ टक्क्यांच्या वाढीसह ७,२२२.३० अंकांवर बंद झाला.
दरकपातीची बाजाराला अाशा
- अर्थसंकल्पात वित्तीय तुटीचे उद्दिष्ट जीडीपीच्या ३.५ टक्केच ठेवू, असे सरकारने सांगितले होते. यामुळे अारबीआय व्याजदर आणखी घटवेल, ही आशा निर्माण झाली.
- आशिया आणि युरोपातील बाजारातही मजबुतीचाच कल होता. यामुळे जागतिक संकेतही सकारात्मक राहिले. एका सर्वेक्षणानुसार सलग दुसऱ्या महिन्यात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वाढ झाली. यामुळे बाजारात "फील गुड' निर्माण झाला.
मालामाल : मंगळवारी गुंतवणूकदार तब्बल २.५ लाख कोटींनी मालामाल झाले. सेन्सेक्सचे एमकॅप ८५.८३ लाख कोटींवरून ८८.३६ लाख कोटी झाले.