आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स कोसळला : दोन महिन्याचा नीचांक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक बाजारातून मिळालेले नकारात्मक संकेत आणि जीएसटी विधेयक पुन्हा अडकण्याची शक्यता यामुळे मंगळवारी भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरणीची नोंद झाली. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स २२० अंकानी घसरून २५३१० अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ६४ अंकांच्या घसरणीसह ७७०१ च्या पातळीवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स मंगळवारच्या व्यवहारात सात सप्टेंबरनंतरच्या खालच्या पातळीवर (सात सप्टेंबरला २४८९३ च्या पातळीवर) बंद झाला आहे. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात सर्व क्षेत्रांतील निर्देशांक घसरणीसह बंद झाले. बँकिंग, मेटल आणि रियल्टी निर्देशांकात चार टक्क्यांच्या पडझडीची नोंद झाली आहे.
अमेरिकेत पुढील आठवड्यात व्याजदरात वाढ करण्यात आल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे एफआयआयच्या वतीने देशातील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होण्याची शक्यता आहे. या गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढणे सुरू केले आहे.जीएसटीबाबत बाजारात नकारात्मक वातावरण तयार झाले असून, त्याचा परिणाम बाजारावर झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केेले आहे. काँग्रेसच्या वतीने जीएसटी मंजूरीसाठी अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे जीएसटी पुन्हा अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.