आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सची घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- देशातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी मानल्या जाणाऱ्या टीसीएसच्या इशाऱ्याचा परिणाम गुरुवारी आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर पाहायला मिळाला. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुरुवारी मोठी घसरण झाली. टीसीएसचे शेअर्स टक्क्यांनी, तर अन्य कंपन्यांचे शेअर्सही चांगलेच घसरले.

या क्षेत्रातील अव्वल कंपन्यांच्या बाजार भांडवलात ३३, ८०० कोटींची घसरण झाली.
अमेरिकेतील वित्तीय क्षेत्रातील ग्राहक आयटीवर खर्च वाढवत नसून त्यामुळे कंपनीच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा टीसीएसने दिला होता. गुरुवारी टीसीएसचे शेअर मुंबई रोखे बाजारात गुरुवारी ५.१४ टक्क्यांच्या घसरणीसह २,३२१.१५ रुपयांवर बंद झाले. दरम्यानच्या काळात ही घसरण ६.५३ टक्के अर्थात हजार २८७ रुपयांवर पोहोचली होती. राष्ट्रीय राेखे बाजारातही याचा परिणाम पाहायला मिळाला. येथे ४.८५ टक्क्यांच्या घसरणीसह ते २, ३२२.१० रुपयांवर पोहोचले होते. एनएसईमध्ये टीसीएसच्या ३५ लाख आणि बीएसईत ३.०२ लाख शेअरची खरेदी-विक्री झाली. अॅडेलवाइज सिक्युरिटीजच्या मते, टीसीएस आणि इन्फोसिससाठी जुलै-सप्टेंबर ही तिमाही तेजीने विकासाची असते. यांच्या महसुलात याच काळात सर्वाधिक वाढ होत असते. बँकिंग आणि फायनान्शियल क्षेत्रातही आयटीची पीछेहाट झाल्याने या तिमाहीत अधिक विकासाच्या अपेक्षा नाहीत. भारतातील १५० अब्ज डॉलरच्या अायटी बाजारात अमेरिकेचा सर्वाधिक वाटा आहे. अन्य तज्ज्ञांच्या मते, टीसीएस आणि इन्फोसिस हे अन्य कंपन्यांच्या तुलनेत वित्तीय क्षेत्रावर अधिक अवलंबून आहेत.
(बाजार भांडवल कोटीत)
अव्वल-५ कंपन्यांना ३४ हजार कोटींचे नुकसान
कंपनीशेअर्समध्ये घट बाजार भांडवलात घट
टीसीएस ५.१४ % २४, ७९७
इन्फोसिस १.६२ % ३, ८२७
विप्रो १.७७ % २,०७५
एचसीएल टेक १.७० % १, ८७१
टेक महिंद्रा २.६१% १.१७०
बातम्या आणखी आहेत...