आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स १७१, तर निफ्टी ३४ अंकांनी वाढून बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - युरोपियन बाजारातून मिळालेल्या चांगल्या संकेतांमुळे भारतीय बाजारात सुरुवातीच्या पडझडीनंतर सकारात्मक वाढ दिसून आली. बुधवारी सेन्सेक्स १७१ अंकांनी वाढून २५,८२२ च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी ३४ अंकांनी वाढून ७८४६ च्या पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्समध्ये २०० आणि निफ्टीमध्ये ७० अंकांपेक्षा जास्तीची पडझड नोंदवण्यात आली होती.

दिवसभराच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रात चांगली वाढ दिसून आली. रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करेल या आशेमुळे सर्वात आधी बँकिंग क्षेत्राच्या निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली. बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजारात बँकिंग निर्देशांकात १ टक्क्यापेक्षा जास्तीची वाढ नोंदवण्यात आली. यादीत समावेश असलेले अनेक शेअर अर्ध्यापेक्षा जास्त वाढीनंतर बंद झाले.

भारतीय शेअर बाजारात आलेल्या सकारात्मकतेच्या कारणांमध्ये सर्वात आधी युरोपियन बाजारातील संकेतांचा उल्लेख करावा लागेल. आर्थिक विकासाबाबत विचार केला, तर चीनमध्ये जाहीर झालेली आकडेवारी निराशाजनक असली तरी युरोपियन बाजारामध्ये एक टक्क्यापेक्षा जास्तीची वाढ नोंदवण्यात आली. तसेच युरोपियन पीएमआयची जी आकडेवारी जाहीर झाली तीतदेखील सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दाखवण्यात आली आहे. ही वाढ गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी आहे. आशिया खंडात मागणी कमी झाल्यामुळे या तेजीचा वेग कमी झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.