आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील घसरण कायम, सेन्सेक्समध्ये 23 अंकांनी घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिवसभराच्या सुस्तीनंतर मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 23 अंकांच्या घसरणीसह 24,459 च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 23 अंकांच्या घसरणीसह 7424 च्या पातळीवर बंद झाला. वास्तविक व्यवहाराच्या शेवटच्या तासात एनर्जी आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी झाली. निफ्टीमध्ये समावेश असलेल्या 50 स्टॉक्समध्ये समावेश असलेल्या वेदांता लिमिटेड 5.6 टक्के तर केअर्न इंडियामध्ये 4.5टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

राष्ट्रीय शेअर बाजारात बँकिंग, इंफ्रा आणि ऑटो इंडेक्समध्ये सर्वात जास्त घसरण नोंदवण्यात आली. बँकिंग एक टक्क्यांच्या घसरणीसह १५,३८१.४५ च्या पातळीवर बंद झाला. इंफ्रा इंडेक्स १.३७ टक्क्यांच्या घसरणीसह २३९३ च्या पातळीवर बंद झाला.