आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स २६ अंक खाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शेअर बाजारात सोमवारी सेन्सेक्स २६ अंकांनी पडून २६,१९३ च्या पातळीवर बंद झाला, तर निफ्टी ५ अंकांनी पडून ७९७७ च्या पातळीवर बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात सुरुवातीला सेन्सेक्समध्ये २०० अंकांपेक्षा जास्त पडझड दिसून आली होती. मात्र, नंतर झालेल्या खरेदीत सेन्सेक्स दिवसभराच्या सर्वोच्च पातळीच्या जवळपास बंद होण्यास मदत झाली.
सोमवारी छोटे शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसून आला. सुरुवातीच्या पडझडीनंतर मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक हिरव्या निशाणाजवळ आला. सोमवारी स्मॉलकॅप निर्देशांक १.२१ टक्के वाढून १०,९३५ च्या पातळीवर बंद झाला. तर मिडकॅप निर्देशांक ०.४४ टक्क्यांनी वाढून १०,६९२ च्या पातळीवर बंद झाला. मिडकॅप इंडेक्समध्ये समावेश असलेल्या शेअरमध्ये सर्वात जास्त तेजी आयडीबीआयमध्ये दिसून आली तर स्मॉलकॅपमध्ये जमना ऑटोमध्ये सर्वाधिक ११.६ टक्के वाढ दिसून आली.
सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या शेअरमध्ये सर्वात जास्त तेजी मारुतीमध्ये दिसून आली. मारुतीचे शेअर २.६४ टक्क्यांनी वाढून बंद झाले. तर हिंदाल्को आणि अॅक्सिस बँकमध्येदेखील २ टक्क्यांपेक्षा जास्त तेजी होती. दिवसभराच्या व्यवहारात सर्वात जास्त तेजी बँकिंग क्षेत्रात नोंदवण्यात आली.

जागतिक परिणाम
शेअर बाजारात सोमवारी झालेल्या पडझडीचे मुख्य कारण जागतिक बाजारातील संकेत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. युरोपियन बाजारात मात्र चांगल्या खरेदीचे चित्र पाहायला मिळाले. तसेच व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्यानेही बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खरेदी झाली.
,,,,,,,,,,,,,,