आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार, सोने तेजीने चकाकले, पाच दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात तेजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सरासरीपेक्षा कमी पावसाच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करत बुधवारी बाजाराने तेजीला कौल दिला. सलग पाच सत्रांतील घसरणीनंतर गुंतवणूकदारांनी ब्ल्यू चिप कंपन्यांच्या खरेदीवर भर दिल्याने सेन्सेक्सला उसळी मारता आली. जीएसटीविषयक विधेयक चालू अधिवेशनातच संसदेत मांडण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री जेटली यांनी सांगितल्यानंतर बाजारात उत्साह दिसून आला. त्यामुळे सेन्सेक्स २१४.१९ अंकांच्या वाढीसह २७,८९०.१३ वर पोहोचला. निफ्टी ५१.९५ अंकांच्या कमाईसह ८,४२९.७० वर स्थिरावला. निफ्टीने घसरणीत गमावलेली ८४०० ची पातळी पुन्हा पार केली. सराफा बाजारातही लग्नसराईमुळे सोने तेजीत आले.

ब्रोकर्सनी सांगितले, हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण होते. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली होती. त्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मांडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा घेतला. सन फार्मासारख्या ब्ल्यू चिप कंपन्यांच्या समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. त्यामुळे सेन्सेक्सच्या वाढीला बळ मिळाले. आशियातील प्रमुख बाजारांत सकारात्मक कल दिसला, तर युरोपातील बाजारात घसरणीचा सूर होता.

तेजीचे मानकरी
हिंदुस्तान युनिलिव्हर, हीरो मोटोकॉर्प, लार्सन, अॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीज लॅब, महिंद्रा अँड महिंद्रा, सन फार्मा, एचडीएफसी, भेल, एचडीएफसी बँक.

टॉप लुझर्स
विप्रो लिमिटेड, ओएनजीसी लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, टाटा स्टील.

पुढील स्लाइडवर वाचा, सोन्याला मिळाली झळाळी...