आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मॅट’चा दिलासा; शेअर बाजारात तेजीची उसळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - किमान पर्यायी कर अर्थात मॅटच्या अनिश्चिततेमुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारात विक्रीचा मारा सुरू हाेता; परंतु केंद्र सरकारने अखेर विदेशी गुंतवणूकदारांची ही चिंता दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याची खात्री दिली. त्यामुळे संपूर्ण बाजाराने सुटकेचा नि:श्वास साेडला. त्यातच रुपयादेखील बळकट झाल्यामुळे बाजारातील मरगळ झटकली गेली. पुन्हा नव्याने झालेल्या खरेदीत सेन्सेक्स ५०६ अंकांनी वाढून २७,१०५.३९ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
ब्रिटनमधील िनवडणूक िनकालानंतर जागतिक शेअर बाजाराला मिळालेली बळकटी, कच्च्या तेलाच्या िकमतीत झालेली घट, स्थानिक बाजारात झालेली मूल्याधिष्ठित खरेदी या सकारात्मक घडामाेडींमुळे सेन्सेक्सला सहा महिन्यांची नीचांकी पातळी सुधारता येऊ शकली, असे मत बाजारातील ट्रेडर्सने व्यक्त केले. गेल्या तीन अाठवड्यात सेन्सेक्सने सपाटून मार खाल्ला हाेता. त्यानंतर गुरुवारी सेन्सेक्स साप्ताहिक अाधारावर ९४.०८ अंकांनी सुधारला.
विशेष म्हणजे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विदेशी गुंतवणूकदार संस्थांवर अाकारण्यात अालेल्या मॅट कराच्या संदर्भात िशफारशी सादर करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे जाहीर केले. त्यामुळे बाजाराला माेठा िदलासा मिळाल्याचे रेलिगेअर िसक्युिरटीजचे किरकाेळ वितरण प्रमुख जयंत मांगलिक यांनी सांगितले. गेल्या तीन सत्रांमधील विक्रीला लगाम घालताना सेन्सेक्स भक्कम पातळीवर उघडला अाणि त्याने लगेचच २७ हजार अंकांची पातळी अाेलांडून २७,१९६.२८ अंकांची कमाल पातळी गाठली.दिवसअखेर सेन्सेक्स ५०६.२८ अंकांनी उसळी घेत २७,१०५.३९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. याअगाेदर ३० मार्च राेजी सेन्सेक्समध्ये ५१७.२२ अंकांची वाढ झाली हाेती. गेल्या तीन दिवसांमध्ये सेन्सेक्स ८९१.४८ अंकांनी गडगडला हाेता. काही महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळण्यास संसदेत हाेत असलेला विलंब अाणि मॅट कराबद्दलची चिंता यामुळे चिंताग्रस्त झालेल्या बाजारात झालेल्या विक्रीनंतर सेन्सेक्सने सव्वासहा महिन्यांची नीचांकी पातळी गाठली हाेती. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील ८,२०० अंकांची पातळी अाेलांडून ८२२४.९५ अंकांच्या कमाल पातळीवर गेला. दिवसअखेर निफ्टी १३४.२० अंकांनी वाढून ८१९१.५० अंकांच्या पातळीवर बंद झाला.
सरकारने मॅटसंदर्भात घेतलेल्या भूमिकेमुळे मध्यावधीच्या कालावधीत विदेशी गुंतवणूकदार संस्थांची िचंता कमी हाेऊ शकेल अशी आशा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली. जगभरातील घडामाेडींचाही बाजारावर परिणाम झाला. ब्रिटनमधील निवडणुकांमध्ये डेव्हिड कॅमरून यांच्या हुजूर पक्षाला िमळालेल्या दणदणीत विजयामुळेही सेन्सेक्स उसळल्याचे व्हेरासिटी ब्राेकिंग सर्व्हिसेसचे संशाेधनप्रमुख जिग्नेश चाैधरी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जाेरदार विक्रीनंतर जागतिक राेखे बाजारपेठेत स्थिरता येण्याचे संकेत मिळाल्यानंतर अाशियाई शेअर बाजारात संमिश्र वातावरण निर्माण झाले. युराेप शेअर बाजारातदेखील तेजीची धारणा हाेती.
बँक समभागांची १८० अंकांची भर
बुधवारी बँक समभागांना माेठा फटका बसला हाेता; परंतु गुरुवारी अायसीअायसीअाय बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक अाणि स्टेट बँकेच्या समभागांना तुफान मागणी अाली. त्यामुळे सेन्सेक्समध्ये जवळपास १८० अंकांची भर पडली.
टाॅप गेनर्स
सिप्ला, अायसीअायसीअाय बँक, हिंदाल्काे, बजाज अाॅटाे, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, अॅक्सिस बँक, रिलायन्स, टाटा पाॅवर, एल अँड टी, अायटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर .
टाटा माेटर्सने वेधले लक्ष
टाटा माेटर्सने हक्कभाग विक्रीच्या माध्यमातून ९०४०.५६ काेटी रुपयांचा निधी उभारल्यामुळे या समभागाने गंतवणूकदारांचे लक्ष वेधले. परिणामी सेन्सेक्स यादीतील कंपन्यांमध्ये टाटा माेटर्सने सर्वाधिक कमाई केली.
रुपयाला तरतरी
गुरुवारी डॉलरच्या तुलनेत २० महिन्यांच्या नीचांकावर पोहोचलेल्या रुपयाला शुक्रवारी तरतरी आली. काही बँका आणि निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्याने रुपयाला ब‌ळ मिळाले. रुपया २९ पैशांनी वाढून ६३.९४ वर पोहोचला.
बातम्या आणखी आहेत...