आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वलक्षी कराच्या चिंतेतून बाजाराची आपटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मार्च अखेर संपलेल्या ितमाहीतील कंपन्यांच्या िनराशाजनक अार्थिक कामगिरीमुळे बाजारात नाराजीचे वातावरण अाहे. दुसऱ्या बाजूला माेठ्या प्रमाणावर िनधी भांडवल बाजारातून बाहेर जात अाहे. गेल्या अाठवड्यातील हे िचत्र नव्या सप्ताहातही कायम राहिले. सकाळच्या सत्रात कमावलेला नफा दुपारनंतरच्या विक्रीच्या फटक्याने अाटला. सलग ितसऱ्या सत्रात सेन्सेक्स २६१ अंकांनी घसरून २७,१७६.९९ अंकांच्या साडेतीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
पूर्वलक्षी करप्रणालीची िचंता विदेशी गुंतवणूकदारांना सतावत अाहे. त्यामुळे गेल्या अाठवड्यापासून त्यांनी भांडवली िनधी काढून घेण्यास सुरुवात केली अाहे. नव्या सप्ताहातही हाच कल कायम राहिल्याने त्याचा बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याचे बाजारातील माहीतगारांनी सांिगतले. भांडवल बाजारात उपलब्ध असलेल्या अाकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी ७७५.४६ काेटी रुपयांच्या समभागांची विक्री केली अाहे. एप्रिल महिन्यातील डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत गुरुवारी संपत असल्याने त्याचाही बाजारावर परिणाम हाेत अाहे. दुसऱ्या बाजूला डाॅलरच्या तुलनेत रुपयादेखील ६३.७७ नीचांकी पातळीवर गेला.
मुंबई शेअर बाजाराचा िनर्देशांक कमाल पातळीवर उघडला. िदवसभरात त्यात १२९ अंकांची वाढ हाेऊन सकाळच्या सत्रात त्याने २७,५६७.२८ अंकांची कमाल पातळी गाठली. अाशियाई शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण अाणि मूल्याधिष्ठित खरेदीमुळे सेन्सेक्समध्ये चांगली वाढ झाली. परंतु नंतर झालेल्या नफारूपी विक्रीमध्ये सेन्सेक्स घसरून २७,१४१.५५ अंकांच्या पातळीवर अाला. िदवसअखेर सेन्सेक्स २६०.९५ अंकांनी घसरून २७,१७६.९९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. याअगाेदर सेन्सेक्स ७ जानेवारीला २६,९०८.८२ अंकांच्या पातळीवर बंद झाला हाेता. गेल्या तीन िदवसांत सेन्सेक्सची ७१३.१४ अंकांची घसरगुंडी झाली अाहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीचा िनर्देशांक िदवसभरात ८३३४.४५ अाणि ८२०२.३५ अंकांच्या पातळीत राहिल्यानंतर िदवसअखेर ९१.४५ अंकांनी घसरून ८२१३.८० अंकांच्या पातळीवर बंद झाला.
मारुती सुझुकीचा िदलासा
मारुती सुझुकीच्या िनव्वळ नफ्यात मार्चअखेर संपलेल्या चाैथ्या ितमाहीत ६०.५ टक्क्यांनी वाढ हाेऊन ताे २८४.२ काेटी रुपयांवर गेला. त्यामुळे बाजारात मारुतीच्या समभागांना मागणी अाल्यामुळे काही प्रमाणात बाजाराचे नुकसान भरून निघण्यास मदत झाली.

टाॅप लुझर्स
भारती एअरटेल, स्टेट बँक, भेल, अायसीअायसीअाय बँक, डाॅ.रेड्डीज लॅब, एचडीएफसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, गेल, िसप्ला, सन फार्मा, अॅक्सिस बँक, िहंदाल्काे, िरलायन्स, अाेएनजीसी, हीराे माेटाेकाॅर्प