आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीमुळे सेन्सेक्स २६६ अंकांनी आपटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगातील प्रमुख शेअर बाजारांतील घसरणीचे वातावरण, चीनची ढासळती अर्थव्यवस्था आणि देशातील कंपन्यांची तिमाही निकालातील असमाधानकारक कामगिरी यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका कायम ठेवला आहे. परिणामी मंगळवारी सेन्सेक्स २६६.४४ अंकांनी घसरून २४,०२०.९८ वर बंद झाला. निफ्टीत ८९.०५ अंकांनी गडगडून ७२९८.२० वर आला. विक्रीच्या माऱ्यात निफ्टी ७३०० या महत्त्वाच्या पातळीच्या खाली बंद झाला.
दलालांनी सांगितले, देशातील कंपन्यांच्या ऑक्टोबर - डिसेंबर तिमाहीतील निराशाजनक कामगिरीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह मावळला असून त्यांचा भर विक्रीवर राहिला. बहुतेक गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा आता सोन्याकडे वळवला आहे. कॉग्निझंटने महसूल घटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचा फटका माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांना बसला. विक्रीच्या माऱ्यात आयटी समभाग ५ टक्क्यांपर्यंत घसरले. आशियातील प्रमुख शेअर बाजारांत घसरणीचा कल होता.

युरोपातील बाजारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी २० समभागांत घसरण दिसून आली.
मिड कॅप, स्मॉल कॅपला िवक्रीचा फटका : गेल्या वर्षभरात तेजीत राहिलेल्या िमड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांना या वर्षी विक्रीचा चांगलाच फटका बसतो आहे. मंगळवारी मिड कॅप निर्देशांक १.९१ टक्क्यांनी, तर स्मॉल कॅप निर्देशांक १.३४ टक्क्यांनी घसरला.