आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीच्या माऱ्याने शेअर बाजारात घसरण कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डेरिव्हेटीव्हज व्यवहारांची मुदत संपत असल्याने व्यवहार अाटाेक्यात ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांना एचडीएफसी अाणि एअरटेलच्या अार्थिक िनकालांनी सपशेल नाराज केले. त्यामुळे बाजारात माेठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स १७० अंकांनी घसरून २७,२२५.९३ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
डेरिव्हेटीव्हज व्यवहारांची मुदत गुरुवारी संपत असल्याने गुंतवणूकदारांनी सावध व्यवहार करणे पसंत केले अाहे. त्यातच भूसंपादन विधेयकाला हाेत असलेला विलंब अाणि भांडवल बाजारातून सातत्याने बाहेर जात असलेला िनधीचा अाेघ या सगळ्या गाेष्टींचा बाजारावर नकारात्मक परिणाम हाेत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी सांिगतले.
एअरटेलने मार्चअखेर संपलेल्या ितमाहीत कमावलेला नफा बाजाराच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे एअरटेलच्या समभागांवर विक्रीचा मारा झाला. एचडीएफसीच्या िनव्वळ नफ्यात ९.६ टक्क्यांनी वाढ हाेऊन ताे मार्चअखेर २६४६.३५ काेटी रुपयांवर गेला. मारुती अाणि अायसीअायसीअाय बँकेच्या िनकालानंतर सेन्सेक्सने मंगळवारी २१९ अंकांची उसळी घेतली हाेती.
सेन्सेक्स २७,३९५.७१ अंकांच्या पातळीवर उघडला अाणि त्यानंतर त्याने अाणखी खालची पातळी गाठली. त्यानंतर या पातळीत सुधारणा हाेऊन सेन्सेक्स २७.४३८.९६ अंकांच्या पातळीवर गेला. काही िनवडक बड्या समभागांना अालेल्या मागणीमुळे सेन्सेक्सने उसळी मारली, परंतु दुपारच्या सत्रात झालेल्या विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स १७०.४५ अंकांनी घसरून २७,२२५.९३ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीचा िनर्देशांक ४५.८५ अंकांनी घसरून ८२३९.७५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. बाजारातील नरमाईच्या वातावरणामुळे विक्रीचा मारा कायम राहिला. फेडरल रिझर्व्हच्या दाेन िदवसांच्या बैठकीचे फलित काय या िचंतेमुळे युराेप अाणि अाशियाईतील अन्य शेअर बाजारात घसरण झाली. त्याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
याशिवाय भूसंपादन विधेयकाला हाेत असलेला विलंब अाणि भांडवल बाजारातून सातत्याने बाहेर जात असलेला िनधीचा अाेघ या सगळ्या गाेष्टींचा बाजारावर नकारात्मक परिणाम हाेत असल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी सांिगतले.

दिग्गज घसरले
भारती एअरटेल, आयटीसी, वेदांता, एचडीएफसी, टाटा मोटर्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती, डॉ. रेड्डीज लॅब
वधारलेले समभाग
अॅक्सिस बँक, गेल, विप्रो, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक.