आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेअर बाजारात किरकोळ वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला. जागतिक बाजारातून मिळालेल्या सुस्त संकेतांचा परिणाम भारतीय बाजारावरदेखील दिसून आला. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २१ अंकांच्या वाढीसह २८,०८२ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक निफ्टी ११ अंकांच्या वाढीसह ८७०९ च्या पातळीवर बंद झाला.
दिवसभराच्या व्यवहारानंतर स्मॉलकॅप स्टाॅक्समध्ये वाढ दिसून आली. स्मॉलकॅप निर्देशांक ०.२५ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. स्मॉल कॅप निर्देशांकात सर्वात जास्त तेजी सुनील हायटेकमध्ये १९ टक्के, जेबीएम ऑटो १४.५३ टक्के नोंदवण्यात आली. सुरुवातीला झालेल्या व्यवहारादरम्यान निफ्टीमध्ये समावेश असलेल्या २७ स्टॉक्समध्ये वाढ नोंदवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...