आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग सहाव्यांदा सेन्सेक्स घसरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - हवामान खात्याने अपुरा पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर बाजारात िचंतेचे वातावरण िनर्माण झाले. त्यातच अाता
मुडीज या पतमानांकन संस्थेने अपुरा पाऊस झाल्यास अन्नधान्याची महागाई वाढण्याची शक्यता असल्याने पतमानांकन नकारात्मक हाेऊ शकते, असे संकेत िदले. त्यामुळे बाजाराच्या िचंतेत अाणखी भर पडली. त्यातून बाजारात झालेल्या विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स सलग सहाव्यांदा ४२ अंकांनी घसरला. सहा िदवसांमध्ये सेन्सेक्स १,३७० अंकांनी
गडगडला अाहे.

निफ्टीचा िनर्देशांक सलग सातव्या िदवशी २१.७५ अंकांनी घसरून ८०२२.४० अंकांच्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स िदवसअखेर ४१.८४ अंकांनी घसरून २६,४८१.२५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या अाठ महिन्यांतील ही नीचांकी बंद पातळी अाहे. अाशियाई शेअर बाजारातील घसरणीचादेखील परिणाम झाला.
बातम्या आणखी आहेत...