आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची पुन्हा गटांगळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मंदावलेली कर्जवृद्धी अाणि सरासरीपेक्षा कमी पाऊस हाेण्याच्या भीतीने पुन्हा एकदा शेअर बाजाराला िचंतेेत टाकले. त्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी मर्यादित व्यवहार केले. विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्सने ४७० अंकांची गटांगळी खात २७,३७०.९८ अशी अाठ महिन्यांची नवी नीचांकी पातळी नाेंदवली. िनफ्टीदेखील अाठ हजारांच्या पातळीखाली गेला.

जागतिक बाजारातील सकारात्मक घडामाेडी अाणि लक्षणीय कमी झालेल्या चालू खात्यातील तुटीकडेही गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. उलट एप्रिल महिन्यातील अाैद्याेगिक उत्पादन अाणि मे महिन्यातील िकरकाेळ महागाईची अाकडेवारी जाहीर हाेणार असल्याने गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेणे पसंत केले. चाैथ्या ितमाहीमध्ये चालू खात्यातील तूट लक्षणीय कमी हाेऊन जीडीपीच्या तुलनेत ०.२ टक्के अशा वर्षातील नीचांकी पातळीवर अाली अाहे. भांडवली सुधारणा हाेण्याची धूसर शक्यता अाणि मंदावलेली कर्जवृद्धी लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी अापले व्यवहार अाटाेक्यात ठेवणे पसंत केल्याचे मत िरलायन्स िसक्युरिटीजचे हितेश अग्रवाल यांनी सांगितले.

कमाई करण्याचे धाेरण
मुंबईशेअर बाजाराचा िनर्देशांंक २७,००० अंकांच्या भक्कम पातळीवर उघडला अाणि नंतर २७,०००.१४ अंकांच्या कमाल पातळीवर गेला. परंतु नंतर नफारूपी विक्रीत ताे २६,३४८.९३ अंकांवर अाला. िदवसअखेर सेन्सेक्स ४६९.५२ अंकांनी घसरून २६,३७०.९८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीचा िनर्देशांकदेखील ८,००० अंकांच्या पातळीखाली गेला. शेवटी िनफ्टी ७९६५.३५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बातम्या आणखी आहेत...