Home | Business | Share Market | Share Market opens with Record 33000 after economy booster

शेअर मार्केट विक्रमी उंचीवर, निफ्टी प्रथमच 10300, तर सेन्सेक्स 33000 च्या पार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 25, 2017, 10:32 AM IST

बुधवारी निफ्टी प्रथमच 10300 वर सुरू झाले. तसेच सेन्सेक्सही 33000 वर पोहचण्यात यशस्वी ठरला.

 • Share Market opens with Record 33000 after economy booster
  नवी दिल्ली - जागतिक बाजारपेठेतून मिळालेले सकारात्मक संकेत, पब्लिक सेक्टर बँकांसाठी रिकॅपिटलायझेशन प्लान आणि इन्फ्रा सेक्टरला बूस्ट देण्यात आल्याने शेअर मार्केटला सुरुवात होताच निर्देशांक विक्रमी उंचीवर पोहोचले. बुधवारी निफ्टी प्रथमच 10300 वर सुरू झाला. तसेच सेन्सेक्सही 33000 वर पोहचण्यात यशस्वी ठरला.

  पीएसयू बँकांच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांच्या तेजीमुळे निफ्टी 113 अंकांनी वाढून 10321 वर सुरू झाला. तर सेन्सेक्स 460 अंकांनी वाढून 33064 वर सुरू झाला. निफ्टीने आज विक्रमी 10340.55 ची विक्रमी पातळी गाठली. तर सेन्सेक्सनेही 33117.33 ची विक्रमी पातळी गाठण्यात यश मिळवले.

  पीएसयू बँक इंडेस्कमध्ये 21 टक्क्यांची उसळी
  - अर्थमंत्र्यांनी सार्वतनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती सुधारण्यासाठी मंगळवारी 2.11 लाख कोटी रुपयांचा रिकॅपिटलायझेशन प्लान जाहीर केला.
  - सरकारच्या या निर्णयाने सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. पीएनबी 30%, बँक ऑफ बडोदा 25, बँक ऑफ इंडिया 20, ओरिएंटल बँक 19.56, कॅनरा बँक 18.49, एसबीआय 18.29, आयडीबीआय बँक 15.38, आंध्रा बँक 14.53, अलाहाबाद बँक 14.36, सिंडीकेट बँक 14.11 आणि इंडियन बँक 11.14 टक्क्यांनी वधारले.
  पुढील स्लाइडवर वाचा, रुपयाची झाली घसरण...

 • Share Market opens with Record 33000 after economy booster
  रुपया घसरला.. 
  बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमकुवत सुरुवात झाली. बाजार सुरू झाला तेव्हा रुपया डॉलरच्या तुलनेत 8 पैशांनी घसरून 65.14 च्या पातळीवर होता. मंगळवारी रुपया डॉलरच्या तुलनेत 5 पैशांनी घसरून 65.06 वर बंद झाला होता. सोमवारी रुपयामध्ये किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. डॉलरच्या तुलनेत रुपया 2 पैशांनी वाढून 65.02 वर बंद झाला होता. 

Trending