आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात घसरगुंडी, सेन्सेक्स ५४१ अंकांनी खाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे ठेवल्यामुळे युरोप शेअर बाजारात नरमाई आली. या नरमाईमुळे भारतीय शेअर बाजारातदेखील विक्रीचा मारा झाला. परिणामी काही बड्या समभागांना विक्रीचा फटका बसून कामकाजाच्या दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स ५४१ अंकांनी घसरून २५,६५१.८४ अंकांच्या दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. विक्रीच्या तडाख्यामध्ये स्मॉलकॅप आणि मिडकॅप समभागांनादेखील मोठा फटका बसला. सेन्सेक्स सकाळच्या सत्रात भक्कम पातळीवर उघडला; परंतु नंतर सुरू झालेल्या चौफेर विक्रीच्या माऱ्यात सेन्सेक्स ५४१.१४ अंकांनी घसरून २५,६५१.८४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. दहा सप्टेंबरनंतरची ही सर्वात नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेदेखील ७७८७.७५ अंकांची नीचांकी पातळी गाठली. दिवसअखेर निफ्टी १६५.१० अंकांनी घसरून ७८१२ अंकांच्या पातळीवर बंद झाला. यामुळे फ्रान्स, जर्मन आणि ब्रिटनमधील शेअर बाजार देखील घसरले आहेत.