आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्समध्ये ४० अंकांची वाढ, गुंतवणूकदार व्यवहारापासून दूरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सप्टेंबरमधील डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची संपत असलेली मुदत तसेच पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे जाहीर होणारे नाणेनिधी धोरण लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी बाजारातील व्यवहारापासून दूर राहणेच पसंत केले. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्समध्ये माफक ४० अंकांची वाढ झाली.

सेन्सेक्सने गुरुवारच्या सत्रात कमाई केली असली तरी गेल्या तीन आठवड्यांत सेन्सेक्सने ३५५ अंकांची साप्ताहिक घसरणीची नोंद केली आहे. निफ्टीमध्ये देखील ११३ अंकांची घट झाली. बकरी ईदनिमित्त शुक्रवारी बाजाराला सुटी आहे.

मुबई शेअर बाजाराचा निर्देशांक २५,७९८.०५ अंकांच्या खालच्या पातळीवर उघडला. दिवसभरात २५,९४९.९० आणि २५,६७०.९६ अंकांच्या पातळीत फिरल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर ४०.५१ अंकांनी वाढून २५,८६३.५० अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दोन दिवसांत मात्र सेन्सेक्सने २११.६६ अंकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकात २२.५५ अंकांची वाढ होऊन तो ७८९४.५० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

डॉ लरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे इन्फोसिस, टीसीएस, विप्राे या अायटी कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी आली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणतीही वाढ न करून सकारात्मक संदेश दिल्यानंतरही त्याचा बाजारावर कोणताही परिणाम झालेला नसून गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाजारात चढ- उताराचे वातावरण अाहे. त्यातही फ्युचर अँड ऑप्शनची मुदत संपत असल्याने त्याचाही बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याचे जिओजित बीएनपी परिबा फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले. भांडवल बाजारात गुरुवारी विशिष्ट समभागांपुरते मर्यादित व्यवहार झाल्याचे मत रेलिगेअर सिक्युरिटीजच्या किरकोळ वितरण विभागाचे प्रमुख जयंत मांगलिक यांनी सांिगतले.
ॉप गेनर्स
लुपिन, गेल, इन्फोसिस, बजाज ऑटो, आयटीसी, विप्रो, टीसीएस, मारुती सुझुकी
टॉप लुझर्स
ओएनजीसी, कोल इंडिया, टाटा स्टील, लार्सन, टाटा मोटर्स, हिंदाल्को, आयसीआयसीआय