आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात घसरण सुरूच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक विकास दराबाबत व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेमुळे अालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरदेखील दिसून आला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २५७ अंकाच्या घसरणीसह २६७६३ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ६९ अंकाच्या घसरणीसह ८२०३ च्या पातळीवर बंद झाला.

गुरुवारी बाजाराची सुरुवातच किरकोळ घसरणीसह झाली होती. त्यानंतर इन्फोसिस आणि इतर आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये आलेल्या घसरणीचा परिणामा बाजारावर दिसून आला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०० ते निफ्टी १०० अंकापेक्षा जास्त घसरला होता. तर एकदा सेन्सेक्स २६९९४ तर निफ्टी ८२७३ च्या वरच्या पातळीवपर्यंत गेला होता. मिडकॅप तसेच स्मॉलकॅप शेअरमध्ये विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांकात ०.५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकात ०.२ टक्क्यांची घसरण दिसून आली. एफएमसीजी, आयटी, बँकिंग, ऑटो, फार्मा आणि कॅपिटल गुड्स शेअरमध्ये सर्वात जास्त विक्रीचा मारा दिसला. निफ्टीमधील एफएमसीजीमध्ये १.९ टक्के, आयटी निर्देशांकात १.५ टक्के, ऑटो निर्देशांकात ०.६ टक्के तर फार्मा निर्देशांकात ०.५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. बँक निफ्टीदेखील ०.६ टक्क्यांच्या घसरणीसह १७८४० च्या पातळीवर आला.
बातम्या आणखी आहेत...