आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेन्सेक्समधील घसरण कायम, ३५१ अंकांनी घसरून २७,००० च्या पातळीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कमी पावसाबराेबरच यंदा दुष्काळ पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात अाल्यामुळे बाजाराला चिंतेने घेरले. त्यातच सेवा क्षेत्राची वाढ १३ महिन्यांत पहिल्यांदाच घटल्याने बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स ३५१ अंकांनी घसरून २७,००० अंकांच्या पातळीच्या खाली गेला. गेल्या दाेन सत्रांत सेन्सेक्स जवळपास १,००११.७९ अंकांनी गडगडला अाहे.

अपु-या मान्सूनमुळे महागाईची जाेखीम वाढण्याची शक्यता अाणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चिततेच्या वातावरणाबद्दल, अार्थिक सुधारणांची मंद गती याबद्दल रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी चिंता व्यक्त केली हाेती.

अल्पकाळातील काही चिंतांचा गुंतवणूकदारांवर परिणाम झाला असून त्यामुळे बाजार सलग दुस-या सत्रात गडगडला. पुढच्या नाणेनिधी धाेरण अाढाव्यामध्ये व्याजदर कमी हाेण्याची शक्यता असून त्याचाही बाजारावर परिणाम झाल्याचे रेलिगेअर सिक्युरिटीचे संशाेधनप्रमुख हितेश अग्रवाल यांनी सांगितले.

बाजारात झालेल्या सरसकट विक्रीच्या मा-यामध्ये प्रामुख्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभागांवर विक्रीचा ताण अाला. मिडकॅप अाणि स्माॅल कॅप समभागांनाही फटका बसला. वास्तविक पाहता सेन्सेक्स सकारात्मक पातळीत हाेता. परंतु नंतर ताे एकदम नकारात्मक पातळीत गेला अाणि २७,००० अंकांच्याही खाली म्हणजे २६,६९८.२६ अंकांच्या नीचांकी पातळीवर अाला.

दिवसअखेर सेन्सेक्स ३५१.१८ अंकांनी घसरून २६,८३७.२०
अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक मधल्या सत्रात ८१०० अंकांच्या पातळीवरून घसरला. दिवसअखेर निफ्टी १०१.३५ अंकांनी घसरून ८१३५.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

अपेक्षेपेक्षा कमी कपात
व्याजदरात अर्धा टक्क्याने कपात हाेण्याची बाजाराची अपेक्षा हाेती; परंतु कपात कमी झाल्याने बाजाराची िनराशा झाली. त्यातच हवामान खात्याने अपु-या पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे त्याचाही बाजारावर परिणाम झाल्याचे बाेनान्झा पाेर्टफाेलिअाेचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गाेयल यांनी सांिगतले.

नेस्ले इंडियावर परिणाम
मॅगी नूडल्सच्या सुरक्षात्मक दर्जाबाबत करण्यात अालेल्या कारवाईमुळे नेस्ले इंिडयाच्या समभागांवर ताण अाला. युनिटेक, एचडीअायअायएल, डीएलएफचे समभागही अापटले.