आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरणीचा पाढा कायम, सेन्सेक्स ११८ अंकांनी गडगडला, निफ्टीवरही दबाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईं - ‘मॅट’ कर अाणि सुधारणा विधेयकांना होत असलेला विवलंब या चिंतेतून बाजार अद्यापही बाहेर पडला नाही. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सातत्याने विक्रीचा मारा सुरू अाहे. परिणामी सलग तिस-या सत्रात सेन्सेक्स ११८ अंकांनी घसरून २६,५९९.११ अंकांच्या सव्वासहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.

रुपयाने मधल्या सत्रात डॉलरच्या तुलनेत २० महिन्यांचा गाठलेला नीचांक अाणि रिझर्व्ह बँकेकडून पुढच्या महिन्यात व्याजदर कमी होण्याची कमी असलेली शक्यता याचा परिणामही बाजारावर झाल्याचे बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले. आशियातील बहुतांश प्रमुख बाजारात घसरण झाली, तर लवकरच्या सत्रात युरोप बाजारही गडगडला हाेता.

विदेशी गुंतवणूकदार संस्था बाजारातून निधी काढून घेत असल्याने बाजार सध्या काॅन्सॉलडेशनच्या स्थितीत आहे. चाैथ्या ितमाहीतील कंपन्यांच्या अार्थिक निकालांनीदेखील बाजाराची निराशा केली अाहे. त्यामुळे सध्याचे वातावरण असेच काही काल कायम राहण्याचा अंदाज बीएनपी पॅरिबा फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशाेधन प्रमुख विनाेद नायर यांनी व्यक्त केला. मुंबईं शेअर बाजाराचा निर्देशांक ११८.२६ अंकांनी घसरून २६,५९९.११ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या वर्षातल्या २१ अाॅक्टाेबरनंतरची सर्वात नीचांक बंद पातळी अाहे.

िदवसभरात सेन्सेक्स २६,४२३.९९ अाणि २६,८५०.३७ अंकांच्या पातळीत फ‍िरला. सलग तिस-या सत्रातील घसरणीमुळे सेन्सेक्समध्ये एकूण ८९१.४८ अंकांनी घसरण झाली अाहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ३९.७० अंकांनी घसरून ८०५७.३० अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्या अगाेदर निफ्टीने ७९९७.१५ अंकांची नीचांकी पातळी गाठली हाेती.
टाॅप लुझर्स
अॅक्सिस बँक, ओएनजीसी, मारुती सुझुकी, आयसीअायसीअाय बँक, टाटा पॉवर, डॉ. रेड्डीज लॅब, टाटा माेटर्स
टाॅप गेनर्स : टीसीएस, विप्राे, इन्फाेसिस
२० महिन्यांनंतर रुपया ६४ वर
सलग पाच दिवस डॉलरकडून धुलाई होणा-या रुपयाचे अवमूल्यन गुरुवारीही सुरूच राहिले. डॉलरच्या तुलनेत रुपया ६९ पैशांनी घसरून ६४.२३ वर आला. हा रुपयाचा २० महिन्यांचा नीचांक आहे. वैकल्पिक पर्यायी कराबाबत (मॅट) संदिग्धता, करविषयक सुधारणांना होणारा विरोध आणि विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून केलेला निधीचा उपसा यामुळे रुपयावर मोठा दबाव आला. डॉलरची मागणी वाढल्याने रुपयाचे या आठवड्यात सातत्याने अवमूल्यन होत आहे. यापूर्वी डॉलरच्या तुलनेत रुपया सहा सप्टेंबर २०१३ रोजी ६५.२४ या पातळीवर आला होता. मागील पाच सत्रांत रुपया १०८ पैशांनी घसरला आहे. रुपयाचे या आठवड्यात १.७१ टक्के अवमूल्यन झाले आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत आलेल्या तेजीमुळेही रुपयावरील दबाव वाढला आहे.