Home | Business | Share Market | Smoking Habit Solve the Magic Layter

धूम्रपानाची सवय सोडवणारे लायटर

वृत्तसंस्था | Update - Jan 22, 2017, 03:06 AM IST

लेबनाॅनची राजधानी बैरुत बॉम्बस्फोटांमुळे कायमच चर्चेत असते. मात्र, सध्या येथील तांत्रिक घडामोडींमध्ये होणाऱ्या बदलामुळे सध्या हे शहर चर्चेत आले आहे. येथील स्टार्टअप कंपन्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. या देशातील लाखो लोकांना हुक्का पिण्याची सवय आहे.

  • Smoking Habit Solve the Magic Layter
    बैरूत (लेबनाॅन) - लेबनाॅनची राजधानी बैरुत बॉम्बस्फोटांमुळे कायमच चर्चेत असते. मात्र, सध्या येथील तांत्रिक घडामोडींमध्ये होणाऱ्या बदलामुळे सध्या हे शहर चर्चेत आले आहे. येथील स्टार्टअप कंपन्या नवनवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. या देशातील लाखो लोकांना हुक्का पिण्याची सवय आहे.

    येथील लोकांच्या धूम्रपानावर नियंत्रण मिळवण्यासाठी समेर अल गरीब यांची ‘स्टाइटर’ नावाची स्टार्टअप कंपनी सध्या चांगले काम करत आहे. या कंपनीने एक स्मार्ट सिगारेट लायटर अॅप बनवले आहे.
    या माध्यमातून युजर किती वेळा धूम्रपान करतो हे या माध्यमातून नोंदवण्यात येते. त्यानंतर वेळोबेळी युजर्सना मोबाइलवर नोटिफिकेशन पाठवले जाते. या माध्यमातून धूम्रपान कधी करावे, कधी करू नये याची माहिती दिली जाते. अशा पद्धतीने अनेक टप्पे पूर्ण केल्यानंतर युजरची धूम्रपान करण्याची सवय मोडते.

Trending