आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स 181 अकांनी वाढून 27808 वर बंद, तेजी होती कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. मंगळवारीही बाजारात तेजी कायम होती. बीएसईच्या लार्जकॅपमध्ये ०.६ टक्के वाढ तर मिडकॅप शेअर्समध्ये ०.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्स १८१.४५ अंकांनी वाढून २७, ८०८ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ५३.१५ अंकांची वाढ झाली. निफ्टी ८, ५२१ अंकांवर बंद झाला.
फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) आणि फार्मा कंपनीच्या शेअर्समधील घसरण वगळता इतर क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाल्याचे चित्र होते. जागतिक संकेत आणि आशियाई बाजारात तेजी कायम असल्याने भारतीय बाजारातही तेजीचे वारे होते. बाजारात आज सर्वाधिक म्हणजेच ३.३० टक्के वाढ नोंदवण्यात आली. खासगी बँकांमध्ये १.८८ टक्क्यांनी वाढ झाली. त्याच बँकांनी निफ्टीत १.५ टक्क्यांची वाढ नोंदवली. रिअॅलिटी शेअर्समध्ये १.३५ टक्क्यांची वाढ कायम होती. एनर्जी शेअर्समध्ये ०.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
निफ्टीतील वाढलेले आणि घसरण झालेले शेअर्स : शेअर बाजारात आज २९ शेअर्समध्ये वाढ आणि २१ शेअर्समध्ये घसरण झाली. सर्वाधिक वाढ नोंदवलेल्या शेअर्समध्ये टाटा स्टील ५.०३ टक्के, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स ४.७४ टक्के वाढीसह बंद झाले. हिंदाल्कोचे शेअर्स ४.६१ टक्क्यांनी वाढले. अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये २.८७ टक्के वाढ नोंदवली गेली. दुसरीकडे मारुतीचे शेअर्स २.११ टक्क्यांनी वाढून बंद झाले आणि ग्रॅसिमच्या शेअर्स १.६९ टक्के तेजीसह बंद झाले. निफ्टीत सर्वाधिक घसरण झालेल्या शेअर्समध्ये टाटा पॉवर १.८३ टक्क्यांनी आणि बीपीसीएलमध्ये १.३६ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. सिप्लाच्या शेअर्समध्ये १.२६ टक्के घसरण झाली. तर कोल इंडियामध्ये १.२२ टक्के घसरण नोंदवण्यात आली. बँक ऑफ बडोदाचे शेअर्स १.४१ टक्के आणि अरबिंदो फार्मा १.०७ टक्के घसरण झाली.
बातम्या आणखी आहेत...