Home | Business | Share Market | Stock market surged strongly, Sensex 406 and Nifty 124 points increased

शेअर बाजाराची जोरदार उसळी, सेन्सेक्स ४०६, तर निफ्टीत १२४ अंकांची वाढ

वृत्तसंस्था | Update - Dec 28, 2016, 03:55 AM IST

भारतीय शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या घसरणीला मंगळवारी जोरदार ब्रेक लागला.

  • Stock market surged strongly, Sensex 406 and Nifty 124 points increased
    मुंबई - भारतीय शेअर बाजारात गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या घसरणीला मंगळवारी जोरदार ब्रेक लागला. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४०६.३४ अंकांच्या वाढीसह २६,२१३.४४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १२४.६० अंकांच्या तेजीसह ८,०३२.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये एफएमसीजी निर्देशांक आणि मेटलमध्ये अनुक्रमे २.६८ आणि २.५७ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली.
    शॉर्ट कव्हरिंगमध्ये बाजारात तेजी आली. आज झालेल्या व्यवहारात निफ्टी ७९०८.६० पर्यंत घसरला होता. तर सेन्सेक्स २५८०७.८७ पर्यंत पोहोचला होता. मंगळवारच्या व्यवहारात बीएसईच्या मिडकॅप तसेच स्मॉलकॅप शेअरमध्ये जोरदार खरेदी झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.७१ टक्क्यांनी वाढून ११७०२.८३ अंकांवर बंद झाला. तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये १.४९% मजबुती नोंदवण्यात आली. एफएमसीजी, मेटल, फार्मा, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आयटी, ऑटो, ऊर्जा क्षेत्रात जोरदार खरेदी दिसून आली.

Trending