आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 व्या वर्षी स्टॉक मार्केटमधून सुरु केले करिअर, 120 कोटी आहे वार्षीक उत्पन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शिकत असताना पैसे कमविणे ही आता सामान्य बाब झाली आहे. पण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करुन करिअरची सुरवात करणे आणि स्वतःची कंपनी सुरु करुन यश मिळविणे एक मोठी गोष्ट आहे. होय आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, जेरोधा ब्रोकरेज हाऊसचे सीईओ नितिन कामत यांची. शेकडो लोकांना नोकरी देण्यासह नितिन वार्षीक १२० कोटी रुपये कमाई करतात.
 
आम्ही त्यांच्याशी बातचित केली तेव्हा त्यांनी सांगितले, की १७ वर्षांच्या वयात स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यापासून माझ्या करिअरची सुरवात झाली. या दरम्यान मी काही वर्षे कॉल सेंटरमध्येही काम केले. यावेळी जरा पैसे जमवले. त्यातून ट्रेडिंग कंपनी सुरु केली. कॉल सेंटरचा जॉब कायम ठेवला. रात्री कॉल सेंटरला, दिवसा ट्रेडिंग आणि शिक्षण असा मेळ यावेळी साधावा लागायचा. असे करत इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली. त्यानंतर जरा पैसा जोडला. २०१० मध्ये स्वतःची ब्रोकरेज कंपपनी जेरोधा सुरु केली.
 
२०१० मध्ये सुरु झाला व्यवसाय
स्टॉक ट्रेडिंगमधून पैसा कमविण्यासह ग्राहकांचा चांगली सेवा देणे यावर नितिनने भर दिला. ही कंपनी सुरु करण्यापूर्वी त्याने एका प्रोफेशन ट्रेडरच्या हाताखाली काम केले. त्याच्याकडून अनुभव घेतला. त्याचा फायदा त्याला त्याच्या व्यवसायात झाला. आता ही कंपनी मोठी झाली आहे. शेकडो लोकांना याच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा नितिनला कसे मिळाले यश... असे घडवले करिअर... 
बातम्या आणखी आहेत...