आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉलरच्या तुलनेत रुपया सावरला, सेन्सेक्स वधारला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या मोठ्या नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच भारतीय शेअर बाजारात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या वाढीमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स ४५६ अंकांच्या वाढीसह २६,३१६ च्या पातळीवर बंद झाला. या वाढीमुळे सेन्सेक्स पुन्हा एकदा १५ नोव्हेंबरच्या त्याच्या आधीच्या पातळीवर, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक निफ्टी १४९ अंकांच्या वाढीसह ८११४ च्या पातळीवर पोहोचला आहे. निर्देशांकात गेल्या सहा महिन्यांदरम्यान झालेल्या एका दिवसातील ही सर्वाधिक वाढ आहे. व्यवहारादरम्यान सर्वच क्षेत्रांतील निर्देशांकात तेजी दिसून आली. त्यात आयटी आणि फार्मा क्षेत्रातील निर्देशांक सर्वाधिक वाढीसह बंद झाले. निर्यातीवर आधारित असलेल्या स्नॅक्सची खरेदी झाल्यामुळेच प्रमुख निर्देशांकात वाढ झाली. रुपया नव्या विक्रमी पातळीवर पोहोचल्यामुळे आयटी आणि फार्मा क्षेत्रातील उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. या दोन्ही क्षेत्रांतील कंपन्यांचा सर्वाधिक हिस्सा अमेरिकेतील बाजारातून येतो.
बातम्या आणखी आहेत...