आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉलरच्या तुलनेत रुपयात विक्रमी घसरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये विक्रमी घसरण नोंदवण्यात आली. गुरुवारी झालेल्या इन्ट्राडे व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया ६८.८६ च्या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. व्यवहाराच्या सुरुवातीलाच रुपया १८ पैशाच्या कमजोरीसह ६८.३६ च्या पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर व्यवहारादरम्यान रुपयांमधील कमजोरी वाढत गेली. शेवटी रुपया डॉलरच्या तुलनेत ६८.७३ च्या पातळीवर बंद झाला. याआधी २८ ऑगस्ट २०१३ रोजी रुपया ६८.८५ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता.

जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाला आहे. तसेच महिन्याच्या शेवटी तेल कंपन्यांच्या वतीने डॉलरची मागणीदेखील वाढली आहे. यामुळे डॉलरला आणखी मदत मिळाली आहे. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या वतीने डिसेंबर महिन्यात व्याजदरात वाढ होण्याचे संकेत देण्यात अाले आहेत. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदार इक्विटी बाजारातून पैसा काढून घेत आहेत. याचाही परिणाम रुपयावर झाला आहे. तसेच अमेरिकेत रोजगाराची संख्या वाढण्यासाठी आपण खर्चात वाढ करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अमेरिकेकडे आकर्षित झाले आहेत. त्यांच्या विजयानंतर रुपयामध्ये आधीच २.९ टक्क्यांची घसरण झाली होती. या सर्व परिस्थितीमुळे रुपयाच्या किमतीमध्ये घसरण होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
बातम्या आणखी आहेत...