एका चुकीने या अब्जाधीशांना केले बरबाद, असे फाटकन जमिनीवर आदळले
नवी दिल्ली- आतापर्यंत आम्ही तुम्हाला शुन्यात विश्व घडविणाऱ्या उद्योजकांची माहिती दिली आहे.
-
नवी दिल्ली- आतापर्यंत आम्ही तुम्हाला शुन्यात विश्व घडविणाऱ्या उद्योजकांची माहिती दिली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा उद्योजकांबाबत सांगणार आहोत ज्यांच्याकडे कधी काळी अब्जावधी रुपयांची संपत्ती होती. त्यांचे नाव देशातील पहिल्या दहा श्रीमंत उद्योजकांमध्ये घेतले जायचे. पण त्यांनी एक चुक केली आणि ती एवढी महाग पडली की त्यांचा बिझनेसच चौपट झाला. आसमानसे टपके और खजुरपे अटके असे जे काही म्हणतात ते त्यांच्यासोबत घडले.
बी रामालिंगा राजू
प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस लिमिटेडची स्थापना बी रामालिंगा राजू यांनी मित्र डीव्हीएस राजू यांच्यासोबत १९८७ मध्ये केली होती. दक्षिण भारतातील राज्य आंध्र प्रदेशातील राजधानी हैदराबाद येथे त्यांनी या कंपनीची स्थापना केली होती. त्यानंतर काही वर्षांत ही कंपनी देशातील प्रमुख चार सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये आली. तब्बल ६० हजार लोकांना या कंपनीने रोजगार दिला. पण त्यानंतर घसरण सुरु झाली. वाढीचा बनाव करण्यासाठी खोेटे आकडे दाखवण्यात आले. पण अखेर चोरी पकडली गेली. रामालिंगा राजू जमिनीवर आदळले.जागतिक बॅंकेने रद्द केला करार
बी रामालिंगा राजू यांच्या कंपनीचे वाढीचे आकडे मुद्दाम वाढवून दाखवण्यात आले होते. ही बाब कबुल केल्यानंतर कंपनीला मोठा फटका बसला. जागतिक बॅंकेचा कंपनीसोबत मोठा करार होता. गेल्या ८ वर्षांपासून तो कायम होता. बॅंकेने लगेच हा करार रद्द केला. गुंतवणूकदारांनी पैसे काढण्यास सुरवात केली. चांगले कर्मचारी कंपनी सोडून गेले. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या चार लोकांनी राजिनामा दिला. रामालिंगा यांना अनेक वर्षे जेलमध्ये जावे लागले. आता त्यांची बेलवर सुटका झाली आहे.पुढील स्लाईडवर वाचा, रामालिंगा राजू प्रमाणेच या उद्योजकांनाही नामुष्कीचा सामना करावा लागला... आदळले जमिनीवर....
-
रेमंड ग्रुपचे फाऊंडर विजयपत सिंघानिया
विजयपत सिंघानिया यांच्याकडे कधी काळी १.४ बिलियन डॉलरची संपत्ती होती. पण आता त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया याने सगळा उद्योग आपल्या हातात घेतला आहे. त्याने वडीलांना केवळ उद्योगातूनच नव्हे तर वडिलोर्पाजित बंगलातूनही बाहेर काढले आहे. आता ही केस कोर्टात आहे. सध्या विजयपत भाड्याच्या घरात राहत असल्याचे समजते. त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या वडीलांनी चक्क ११०० पद्ममिनी कार कर्मचाऱ्यांना भेट दिल्या होत्या. आता याच उद्योजकावर अशी नामुष्किची वेळ आली आहे.
-
साहारा ग्रुपचे फाऊंडर सुब्रत रॉय
सुब्रत रॉय यांना साहाराश्री म्हटले जाते. कधी काळी गोरखपूर येथे ते लंम्ब्रेटा स्कूटरवर बिस्किट आणि नमकीन विकायचे. त्यानंतर त्यांनी साहारा या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर कधी मागे वळून बघितले नाही. भारतातील श्रीमंत लोकांमध्ये त्यांची गणती होती. त्यांच्या कंपनीचे बाजारमुल्य लाखो करोडो रुपयांचे आहे. पण गेल्या काही वर्षांपूर्वी एका प्रकरणी न्यायालयाने त्यांना अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ते तिहार तुरुंगात आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांना ९ वेळा जामिन देण्यात आला. पण पूर्णपणे सुटका झालेली नाही.
-
युनाटडेट स्पिरिट्स आणि किंगफिशरचे मालक विजय माल्या
विजय माल्या यांचे वडीलही उद्योजक होते. त्यांनी वडीलांच्या व्यवसायातून सुरवात केली. युनायटेड स्पिरिट्सला एका मोठा ब्रांड केले. त्यानंतर किंगफिशर एअरलाईन्सची स्थापना केली. पण हा निर्णय चुकीचा ठरला. त्यांना यात मोठे नुकसान झाले. तरी ते या व्यवसायात पैसे ओतत गेले. याचा त्यांना फटका बसला. त्यांची एअरलाईन तोट्यात गेली. बॅंकांनी पैशांसाठी तगादा लावला. लोन चुकते करणे माल्यांना जवळपास अशक्य होते. अशा वेळी त्यांनी सर्व संपत्ती विकून विदेशात पळ काढला. सध्या त्यांच्यावर वेगवेगळ्या कोर्टात खटले सुरु आहेत. त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे.