Home | Business | Share Market | this company earns 1200 cr even if on the verge of insolvency

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे ही कंपनी, एका रात्रीत कमविले 1200 कोटी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 15, 2017, 05:49 PM IST

नवी दिल्ली- देशातील एका मोठी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. या कंपनीचे हजारो कोटीचे प्रोजेक्ट अटकले आहेत.

 • this company earns 1200 cr even if on the verge of insolvency

  नवी दिल्ली- देशातील एका मोठी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. या कंपनीचे हजारो कोटीचे प्रोजेक्ट अटकले आहेत. कोट्यवधी गुंतवणुकदारांनी या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतविले आहेत. आता हे पैसे बुडण्याच्या मार्गावर आहेत असे बोलले जात आहे. गुंतवणुकदारांनी गुंतविलेले पैसे वाचविण्यासाठी स्वतः सरकार कसोशिने प्रयत्न करत आहे. असे असतानाही अगदी एका रात्रीत या कंपनीने चक्क १२०० कोटी रुपयांची माया कमविली. कार्पोरेट सेक्टरमधील हे एक आश्चर्य आहे.

  सरकारच्या नियमाचा फायदा
  केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी इन्सॉल्व्हन्सी अॅण्ड बॅंकरप्सी कायदा लागू केला. याचा प्रमुख उद्देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या कंपन्यांमधील गुंतवणूकदार आणि बॅंकांचे पैसे वाचविणे. या कायद्याचा फायदा या कंपनीने उचलला आहे.

  पुढील स्लाईडवर वाचा, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतानाही कसे कमविले १२०० कोटी रुपये...

 • this company earns 1200 cr even if on the verge of insolvency

  फसलेल्या प्रोजेक्टसाठी २० कंपन्या शर्यतीत
  आम्ही जयप्रकाश म्हणजेच जेपी ग्रुपबद्दल बोलतोय. या ग्रुपच्या फसलेल्या प्रोजेक्टसाठी जेएसडब्ल्यू स्टील आणि लोढा ग्रुपसह अनेक कंपन्या शर्यतीत आहेत. या कंपन्यांनी फसलेल्या प्रोजेक्टवर २००० कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दाखवली आहे. याचा मात्र जेपी ग्रुपला फायदा झाला आहे. इतर कंपन्यांनी रस दाखविल्याने जेपीचे मार्केट व्हॅॅल्यू वाढले आहे.

 • this company earns 1200 cr even if on the verge of insolvency

  काही तासांत कमविले १२०० कोटी
  २० कंपन्या शर्यतीत असल्याचे वृत्त शेअर बाजारात पसरले. त्यानंतर जयप्रकाश असोसिएट्सचे शेअर १६.३९ टक्क्यांनी वाढून २१.३० वर गेले. जयप्रकाश पॉवर वेंचर ६.६४ ने वाढून ७.८७ रुपयांवर गेले. जेपी इन्फ्राटेकचा स्टॉक १० टक्क्यांनी वाढून १५.२२ रुपयांवर गेला. त्यामुळे ग्रुपचे एकूण मार्केट व्हॅल्यू १२०० कोटींनी वाढले.

 • this company earns 1200 cr even if on the verge of insolvency

  असे वाढले बाजारमुल्य
  जेपी असोसिएट्स- ७२९ कोटी रुपये
  जेपी पॉवर- २९३ कोटी रुपये
  जेपी इन्फ्राटेक- १९१ कोटी रुपये

Trending