Home | Business | Share Market | this company related to padmavati movie suffering huge losses

पद्मावती मुव्हीशी निगडित या कंपनीचे झाले 28 हजार कोटींचे नुकसान, असा बसला फटका

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 24, 2017, 05:25 PM IST

नवी दिल्ली- गेल्या काही आठवड्यांपासून संजय लिला भन्साळी यांची मुव्ही 'पद्मावती' चांगलीच चर्चेत आहे.

 • this company related to padmavati movie suffering huge losses

  नवी दिल्ली- गेल्या काही आठवड्यांपासून संजय लिला भन्साळी यांची मुव्ही 'पद्मावती' चांगलीच चर्चेत आहे. राजपूत समाजानेे या मुव्हीला तीव्र विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत मुव्ही रिलीज होऊ दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे. मुव्ही भारतात प्रदर्शित होणार की नाही किंवा कधी होणार यावर बरीच चर्चा झडत आहे. या मुव्हीशी निगडित असलेली एक कंपनी नुकसान सहन करत आहे. गेल्या एका वर्षापासून या कंपनीचे अब्जावधींचे नुकसान झाले आहे.

  पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या, पद्मावती मुव्हीशी संबंधित या कंपनीची माहिती...कसे झाले नुकसान...

 • this company related to padmavati movie suffering huge losses

  हॉलिवूडची सर्वांत मोठी प्रोड्युसर कंपनी आहे वायकॉम
  अमेरिकेचा मल्टीनॅशनल मीडिया ग्रुप Viocom Inc याबद्दल आम्ही बोलतोय. हॉलिवूडची ही सर्वांत मोठी प्रोड्युसर कंपनी आहे. त्यांची जॉईंट व्हेंचर Viocom 18 ची सब्सिडिअरी मोशन पिक्चर्सने पद्मावतीला फायनान्स केले आहे. या चित्रपटाला संजय लीला भन्साळी यांच्या भंसाली प्रोडक्शनने प्रोड्यूस केले आहे. या कंपनीने यापूर्वी टॉयलेट, क्वीन सारख्या चित्रपटांना फायनान्स केले होते.

 • this company related to padmavati movie suffering huge losses

  एका वर्षांत बुडाले २८ हजार कोटी
  गेल्या वर्षाच्या विचार केला तर या कंपनीचे २८ हजार कोटी रुपये नुकसान झाले आहे. अमेरिकी कंपनी Viacom चे शेअर गेल्या एका वर्षात ११ डॉलर म्हणजेच ७१५ रुपयांनी खाली आले आहे. सध्या या शेअरचा भाव २६.६८ डॉलर सुरु आहे.

 • this company related to padmavati movie suffering huge losses

  या कंपनीचे बाजारमुल्य ११.०३ अब्ज डॉलर
  सध्या या कंपनीचे बाजारमुल्य ११.०३ अब्ज डॉलर म्हणजे ७१ हजार ६९५ कोटी रुपये आहे. एका वर्षापूर्वी हेच बाजारमुल्य १५.३९ अब्ज डॉलर म्हणजेच १ लाख करोडच्या जवळपास होते.

Trending