आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1200 रुपयांचे केले 15600 कोटी, हे आहेत भारताचे वॉरन बफे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पैशाने पैसा कमविता येतो असे म्हटले जाते. पण किती पैशांमध्ये आपण किती पैसे कमवितो यावर आपली क्षमता तपासली जाते. शेअर गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे असे म्हटले जाते.  १९८५ मध्ये त्यांनी १२०० रुपयांपासून बिझनेसला सुरवात केली होती. त्याचे त्यांनी १५,६०० कोटी करुन दाखविले. विशेष म्हणजे आता त्यांची संपत्ती एवढी वाढली आहे की देशातील पहिल्या १०० श्रीमंत लोकांमध्ये त्यांचे ५३ वे स्थान आहे.

 

गुंतवणुदरांची असते नजर
- राकेश झुनझुनवाला शेअर गुंतवणूकदार आहेत. त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला हीसुद्धा त्यांना मदत करते. विशेष म्हणजे शेअरबाजारात पैसे गुंतवणाऱ्या लोकांच्या नजरा त्यांच्यावर असतात. त्यांनी एखादा शेअर विकत घेतला तर इतरही तोच विकत घेण्याचा प्रयत्न करतात.
- राकेश झुनझुनवाला यांनी १९८५ मध्ये १२०० रुपयांपासून सुरवात केली होती. त्यावेळी त्यांनी टाटा टी कंपनीचा शेअर विकत घेतला होता. १९८६ मध्ये टाटा टीचे ५ हजार शेअर विकून त्यांनी ५ लाख रुपये नफा कमावला होता.
- या पैशांमधून त्यांनी आणखी काही शेअर विकत घेतले. त्यातून तब्बल १५,६०० कोटी रुपये कमविले. आता त्यांची अब्जावधी रुपये संपत्ती आहे.  

 

झुनझुनवाला यांच्या टिप्स
- गुंतवणूक करताना स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा.
- योग्य संधी साधा. त्यानंतर रिटर्नवर फोकस करा.
- गुंतवणुकीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे की त्यातून तुम्हाला किती रिटर्न मिळणार आहे.
- लहान शेअरकडे दुर्लक्ष करु नका. त्यातूनही तुम्ही चांगले मार्जिन कमवू शकता.
- बाजारपेठेत मंदीचे वातावरण असेल तर तुमच्या पोर्टफोलियोकडे लक्ष ठेवा.
- शेअर लगेच कमी नफ्यासाठी विकण्याची घाई करु नका.
- दिवसातून किमान दोन वेळा तुमचा पोर्टफोलियो चेक करा.

 

पुढील स्लाईडवर वाचा, या दोन गुंतवणुकदारांनी मोठमोठ्या उद्योजकांना टाकले मागे... वाचा कोटीच्या कोटी उड्डाणांची यशोगाथा...

बातम्या आणखी आहेत...