Home | Business | Share Market | this man had 35 k capital, now stand on 500 cr property

कधी काळी जेवायचे होते वांदे, या व्यक्तीने 35 हजारांचे केले 500 कोटी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 29, 2017, 11:55 AM IST

नवी दिल्ली- आजकाल सर्वांनाच श्रीमंत व्हायचे आहे. पण जो माणूस एखाद्या स्ट्रॅटेजीवर काम करतो आणि पुढे जातो तोच श्रीमंत होऊ

 • this man had 35 k capital, now stand on 500 cr property

  नवी दिल्ली- आजकाल सर्वांनाच श्रीमंत व्हायचे आहे. पण जो माणूस एखाद्या स्ट्रॅटेजीवर काम करतो आणि पुढे जातो तोच श्रीमंत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा माणसाची स्टोरी सांगणार आहोत ज्याने ३५ हजार रुपयांचे आपल्या मेहनतीच्या बळावर ५०० कोटी केले. यासाठी या माणसाने फॅक्टरी लावली नाही की जॉब केला नाही. जाणून घ्या कोण आहे हा माणूस, त्याने कसे मिळवले यश.

  आम्ही बोलतोय केडिया सेक्युरिटीजचे एमडी विजय केडिया यांच्याबद्दल. त्याने वयाच्या १८ व्या वर्षी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगचे काम सुरु केले होते. स्टॉक ब्रोकरच्या कुटुंबात जन्म झालेल्या केडिया यांना ब्रोकिंगमध्ये रस नव्हता. पण आज गुंतवणुकीच्या जगात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. ट्रेडिंगच्या चुकांमधून बोध घेत ते आता एक यशस्वी गुंतवणुकदार झाले आहेत.

  पुढील स्लाईडवर वाचा, जेवायलाही पैसे नव्हते... कसे खडतर आयुष्य जगत मिळवले यश... असा केला संघर्ष....

 • this man had 35 k capital, now stand on 500 cr property

  कठिण काम होते ट्रेडिंग
  विजय केडिया यांने वयाच्या १८ व्या वर्षी कोलकता स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर ट्रेडिंगचे काम सुरु केले. १० वर्षे काम केल्यावर त्यांना जाणवले की मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे एक अवघड काम आहे. मार्केटमध्ये पैसे गुंतवल्याने बरेच नुकसान होत होते. त्यामुळे त्यांना ट्रेडिंगमधून जास्त रिटर्न मिळत नव्हते. ट्रेडिंगमध्ये केवळ १ टक्का यश मिळते असे ते सांगतात.

 • this man had 35 k capital, now stand on 500 cr property

  कोलकत्यातून मुंबईत आले
  केडिया यांनी सांगितले, की त्यांचे मेंटर एसपी मोदी आहेत. त्यांनी मला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करायची हे शिवकवले. त्यांची स्ट्रटेजी वापरुन मी बराच पैसा कमवला. पण काही मिळवण्यासाठी बरेच काही करावे लागते. त्यामुळे मी कोलकता सोडून मुंबईला स्थायी होण्याची निर्णय घेतला. मुंबई स्टॉक मार्केट एक सागर आहे. तुमच्या परसेप्शनवर तुमचे उत्पन्न ठरते.

 • this man had 35 k capital, now stand on 500 cr property

  जेवायला नव्हते पैसे
  मी केवळ १५ ते २० हजार रुपये घेऊन मुंबईत आलो होतो. सुरवातीला प्रचंड स्ट्रगल करावा लागला. जेवायला पैसे नव्हते तरी हातातील पैसे खर्च केले नाही. स्टॉम मार्केटमध्ये गुंतवले. त्यातून पैसा कमवला. अनुभवातून शिकत गेलो.

 • this man had 35 k capital, now stand on 500 cr property

  एसीसीत मिळाचे चांगले रिटर्न
  त्यांनी गुंतवणुकीची सुरवात पंजाब ट्रॅक्टर्सपासून केली. त्यांनी संपूर्ण ३५ हजार रुपये या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवले होते. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. त्यातून मिळालेल्या पैशांमधून एसीसीचे १० हजार शेअर ३०० रुपयांच्या भावाने विकत घेतले. पहिल्या वर्षी नुकसान झाले. पण सहा महिन्यात या शेअर्सची किंमत ३००० रुपये प्रति शेअर झाली.

 • this man had 35 k capital, now stand on 500 cr property

  याच पैशांमधून घेतला पहिला फ्लॅट
  केडिया यांनी एसीसीत प्रॉफिट बुकिंग केले. त्यातून मिळालेल्या पैशांमधून जोगेश्वरीत एक फ्लॅट विकत घेतला. त्याची किंमत ४ लाख रुपये होती. त्यानंतर मागे वळून बघितले नाही. आज ते यशस्वी गुंतवणुकदार आहेत. अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी गुंतवणक केली आहे. आता त्यांची संपत्ती ५०० कोटींची झाली आहे.

 • this man had 35 k capital, now stand on 500 cr property

  नवीन गुंतवणुकदारांना दिला सल्ला
  - नवीन गुंतवणुकदारांनी आधी म्युचल फंडमध्ये पैसे लावयला हवेत.
  - ट्रेडिंग ऐवजी गुंतवणूक करा. घाई करु नका.
  - आधी स्वतःचे परसेप्शन डेव्हलप करा. नंतर गुंतवणूक करा.
  - स्टॉक मार्केट आणि कंपन्यांचा अभ्यास करा. नंतर गुंतवणूक करा.
  - लॉंग टर्म रिटर्न मिळवण्याचा अॅप्रोच ठेवा.

 • this man had 35 k capital, now stand on 500 cr property

  केडिया झाले मेन्टॉर

  मुंबईच्या स्टॉक मार्केटमध्ये आले तेव्हा केडिया अत्यंत बिकट परिस्थित होते. त्यांच्याकडे खायलाच काय एखाद्या ठिकाणी राहायलाही पैसे नव्हते. पण त्यांनी मेहनीच्या बळावर बक्कळ पैसे कमवून दाखवले. आता ते इतरांसाठी मेन्टॉर झाले आहेत. अनेकांना ते गुंतवणुकीचे सल्ले देतात.

 • this man had 35 k capital, now stand on 500 cr property

  मुंबई स्टॉक मार्केटमध्ये कमविले नाव

  केडिया यांनी मुंबई स्टॉक मार्केटमध्ये मोठे नाव कमविले आहे. मोठमोठे गुंतवणुकदार त्यांचा सल्ला घेऊन पैसे लावतात. त्यांना कंपन्यांची आणि स्टॉक मार्केटच्या लहरीपणाची चांगली माहिती आहे. याचा त्यांना फायदा झाला आहे.

Trending