Home | Business | Share Market | this young girl took 1.5 lacks from mother, now has 1700 cr assets

आईने दिले 1.5 लाख, या तरुणीने करुन दाखवले 1700 कोटी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 01, 2017, 10:54 AM IST

नवी दिल्ली- ग्लोबल आंथ्रप्रेन्योर समिटच्या निमित्ताने अमेरिकेच्या अनेक यशस्वी महिलांची ओळख भारताला झाली आहे.

 • this young girl took 1.5 lacks from mother, now has 1700 cr assets

  नवी दिल्ली- ग्लोबल आंथ्रप्रेन्योर समिटच्या निमित्ताने अमेरिकेच्या अनेक यशस्वी महिलांची ओळख भारताला झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांक ट्रम्प यांची सुमारे २००० कोटींची संपत्ती असून त्या फॅशन इंडस्ट्रीतील एका प्रख्यात ब्रांडच्या मालकिण आहेत. अशाच एका तरुणीची सक्सेस स्टोरी समोर आली आहे. जेसिका क्लिसॉय असे त्यांचे नाव आहे. जेसिका यांनी आईकडून १.५ लाख रुपये उधार घेऊन बिझनेस सुरु केला होता. त्यांचा बिझनेस चालेल असे आईलाही वाटले नव्हते. पण म्हणतात ना की तुम्ही तुमच्या उद्देशावर ठाम राहिलात तर यशही झक मारुन मिळते. तसेच काहीसे तिच्याबाबत झाले. आता तिची १७०० कोटींची प्रॉपर्टी आहे. अमेरिकेत तिचे नाव मोठ्या कौतुकाने घेतले जाते.

  पुढील स्लाईडवर बघा, एका सर्वसाधारण तरुणी कशी झाली मिलेनियर....

 • this young girl took 1.5 lacks from mother, now has 1700 cr assets

  अशी झाली सुरवात
  जेसिका क्लिसॉय प्रेग्नंट होती तेव्हा वेबी केअर प्रोडक्टवर असलेले लेबल्स वाचायची. काही प्रोडक्टच्या लेबलवर असलेली माहिती वाचून तिला धक्का बसला. या प्रोडक्टमध्ये अनेक हानिकारक केमिकल आहे, जे लहान बेबीला अपायकारक राहू शकतात. तिने तिच्या बेबीसाठी घरीच शॅम्पू तयार केला. त्यात केमिकल्स जराही नव्हते.  

 • this young girl took 1.5 lacks from mother, now has 1700 cr assets

  आईकडून घेतले पैसे
  बाजारपेठेत अनेक बेबी प्रोडक्ट होते. त्यात केमिकल्सचे प्रमाण भरपूर होते. तिने स्वतः तयार केलेला ऑरगॅनिक शाम्पू बाजारपेठेत विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आईकडून १.५ लाख रुपये उधार घेतले. १९९५ मध्ये कॅलिर्पोनियात सुरवात केली. आता तिचे प्रोडक्ट फुड्स, वॉलमार्ट, टारगेट सारख्या मॉलमध्ये विकले जातात.

 • this young girl took 1.5 lacks from mother, now has 1700 cr assets

  १७०० कोटींची मालकिण
  आज तिची कंपनी ९० नॉनटॉक्सिक, ऑर्गेनिक प्रोडक्ट तयार करते. अमेरिकेतील १० हजारांपेक्षा जास्त रिटेल मार्टवर तिच्या प्रोडक्टची विक्री होते. सुरवातीच्या दिवसांमध्ये तिने अगदी रोड शो आयोडित करुन प्रोडक्ट विकले. त्यानंतर लोकांचा विश्वास वाढत गेला. तिच्या प्रोडक्टची विक्री वाढली. आता तिची १०० एकरांमध्ये मोठी प्रयोगशाळा आहे. तेथील वनस्पतींचा वापर प्रोडक्टमध्ये केला जातो.

 • this young girl took 1.5 lacks from mother, now has 1700 cr assets

  इतर तरुणींसाठी प्रेरणास्थान

  अमेरिकेतील इतर तरुणी तिला मेन्टॉर मानतात. त्यांनाही तिच्यासारखा व्यवसाय सुरु करायचा आहे. ती अशा तरुणींना प्रोत्साहन देते. एखादी गोष्ट करण्याची प्रबळ इच्छा असेल तर एखादी तरुणी काय करु शकते याचे ती मुर्तिमंत उदाहरण आहे.

 • this young girl took 1.5 lacks from mother, now has 1700 cr assets

Trending