आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • U.S. Stock Market Wraps Up Its Best Week Of 2015

तीन आठवड्यांपासून अमेरिकेत तेजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकी शेअर बाजार शुक्रवारी अर्ध्या टक्क्याच्या वाढीसह बंद झाला. यासोबतच अमेरिकेतील बाजार सलग तीन आठवड्यांपासून तेजीसह बंद झाला आहे. या आठवड्यात डाओ जोन्स ०.८ टक्के, नॅसडॅक १.२ टक्के आणि एस अँड पीमध्ये ०.९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. एस अँड पी सलग तीन आठवड्यांपासून वाढीसह बंद झाला आहे.

मे महिन्यानंतर इतक्या जास्त कालावधीसाठी झालेली ही पहिलीच वाढ आहे. अमेरिकेत जाहीर झालेल्या आकडेवारीत ग्राहकीची आकडेवारी चांगली आली आहे. ग्राहकी वाढण्याच्या शक्यतेमुळेच या बाजारात वाढ झाली असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच कंपन्यांची आकडेवारीदेखील चांगली आहे. त्याचाही परिणाम झाला आहे. त्यामुळेच बाजारात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या खरेदीचा फायदा बाजाराला मिळत आहे. याआधी व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजामध्ये ५०० कंपन्यांचे उत्पन्न ४.८ टक्क्यांनी कमी होण्याचा
अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता यामध्ये कपात करण्यात आली असून ३.९ टक्के उत्पन्न कमी होण्याचा अंदाज नव्याने व्यक्त करण्यात आला आहे.