Home | Business | Share Market | Update your Aadhaar Card info in these five places ASAP

हे आहेत आधार कार्डचे 5 'झमेले', होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 23, 2017, 11:21 AM IST

नवी दिल्ली- तुम्हाला सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नको असेल तरीही तुम्हाला या ५ ठिकाणी तुमचे आधार अपडेट करावे

 • Update your Aadhaar Card info in these five places ASAP

  नवी दिल्ली- तुम्हाला सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नको असेल तरीही तुम्हाला या ५ ठिकाणी तुमचे आधार अपडेट करावे लागेल. यातील चार जागांसाठी सरकारने ३१ डिसेंबर २०१७ ची डेडलाईन ठेवली आहे. मोबाईल सिमसाठी डेडलाईन आहे ६ फेब्रुवारी २०१८. सरकारने दिलेल्या सुचनांप्रमाणे तुम्ही येथे आधार अपडेट केले नाही तर तुमची सेवा बंद केली जाईल. त्याचा आर्थिक आणि मानसिक त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. अखेरच्या दिवसांमध्ये लोकांची एवढी गर्दी झालेली असेल की तुमचा नंबर लागणे कठिण होईल. त्यामुळे तुम्ही वेळेच्या आधीच सक्रीय झालेेले योग्य राहील.

  या ४ जागी ३१ डिसेंबरपर्यंत करावे लागेल आधार अपडेट
  बॅंक अकाऊंट, इन्शुरन्स, डीमॅट अकाऊंट आणि म्युचल फंड यासाठी तुमचे आधार अपडेट करणे अनिवार्य आहे. तुम्ही असे केले नाही तर तुमच्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात. त्याचा फटका निश्चितच तुम्हाला बसल्याशिवाय राहणार नाही.

  पुढील स्लाईडवर वाचा... या कारणामुळे आधार लिंक करणे होईल कठिण...

 • Update your Aadhaar Card info in these five places ASAP

  आधारशी मोबाईल क्रमांक जोडणे
  आधार कार्डला मोबाईल क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. तुमचा मोबाईल क्रमांक बंद झाला तर तुम्हाला इतर सेवांसोबत आधार कार्ड जोडता येणार नाही. कारण कोणत्याही सेवेला आधारशी जोडताना एका ओटीपी क्रमांक तुमच्या मोबाईल फोनवर येईल. फोन अॅक्टिव्ह नसेल तर तुम्हाला ओटीपी मिळणार नाही.

   

  काय आहे पद्धत
  आधार कार्डच्या वेबसाईटवर जा

  - येथील व्हेरिफाय आधार नंबरच्या ऑप्शनवर जाऊन आधार क्रमांक टाका. यासह एक सेक्युरिटी कोड जनरेट होईल. तोही इन्सर्ट करा.
  - मोबाईल नंबर व्हेरिफाईड असेल तर तसे वेबसाईट तुम्हाला सांगेल.
  - मोबाईल नंबर व्हेरिफाईड नसेल तर या वेबसाईटवरुन एका फॉर्म डाऊनलोड करावा लागेल. हा फॉर्म भरुन आधार सेंटरवर जावे लागेल. येथे तुम्हाला आधार अपडेट करायची कारवाई करावी लागेल.

 • Update your Aadhaar Card info in these five places ASAP

  तीन पद्धतीने करा अपडेट


  बॅंक अकाऊंटवर आधार तीन पद्धतीने अपडेट केले जाऊ शकते.
  १) बॅंकेच्या ब्रांचला भेट द्या. तुमचे आधार अपडेट करा.
  २) नेट बॅंकींग सुरु करा. येथे आधार अपडेट करण्याचे ऑप्शन दिसेल. तेथे तुमचा आधार क्रमांक टाका. त्यानंतर सबमिट करा. काही दिवसांत तुमचे आधार बॅंकेत अपडेट झाले असेल.
  ३) एसएमएसच्या माध्यमातूनही करता येईल आधार अपडेट. बॅंकेच्या वेबसाईटला भेट द्या. प्रत्येक बॅंकेची पद्धत वेगळी आहे.

 • Update your Aadhaar Card info in these five places ASAP

  ऑफ लाईनही करता येईल अपडेट
  सरकारने विम्यालाही आधारशी जोडले आहे. हे काम केवळ ऑफलाईन पद्धतीने करता येईल. तुम्हाला आधार कार्डची फोटोकॉपी विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन द्यावी लागेल. पुढची कारवाई विमा कंपनी करेल.

   

  डीमॅॅट अकाऊंटला असे करा आधारची अपडेट

   

  यासाठी तुम्ही दोन पद्धतींचा वापर करु शकता
  १) आधारची एक फोटोकॉपी ब्रोकरला द्या. त्यानंतर तो तुमचे आधार अपडेट करेल. तुमचे डीमॅट आधारला संलग्न होईल.
  २) तुमच्या ब्रोकरच्या वेबसाईटवर जा. तुम्हाला आधार अपडेट करण्याचे ऑप्शन मिळेल. तेथे तुमचा आधार क्रमांक टाका. त्यानंतरची कारवाई ब्रोकर स्वतः करेल.

 • Update your Aadhaar Card info in these five places ASAP

  म्युचल फंडसाठी अशी आहे प्रक्रिया
  आरटीएच्या वेबसाईटवर जावे लागेल
  रजिस्ट्रार अॅण्ड ट्रान्सफर एजंट (आरटीए) च्या वेबसाईटवर तुम्हाला जावे लागेल. सध्या चार कंपन्या ही सेवा देत आहे. यात सीएएमएस, फ्रॅंकलिन टेम्पलटन, कार्वी आणि सुंदरम बीएनपी यांचा समावेश आहे.

   

  ही आहे पद्धत
  - मोबाईल नंबर आधारशी अपडेट आहे असे लोक या कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म डाऊनलोड करु शकतात. तो भरुन म्युचल फंड कंपनी किंवा एडंटला द्या.
  - मोबाईल नंबर आधारशी अपडेट आहे असे लोक साईटवरच पॅन नंबर टाकून पुढील काम करु शकतात. त्यांना एक ओटीपी येईल. तो साईटवर टाकून अपडेट करा. त्यानंतर तुमचे आधार म्युचल फंडशी अपडेट झाले असेल.

 • Update your Aadhaar Card info in these five places ASAP

  सिमकार्डला असे करा आधारशी लिंक
  - १ डिसेंबरपासून सिमकार्ड आधारशी लिंक करण्याची ऑनलाईन सुविधा पुरवली जाणार आहे. त्यानंतर मोबाईल कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.
  - त्यासाठी मोबाईल कंपनीच्या वेबसाईटवर जावे लागेल. आधार अपडेटची सुविधा दिली असलेल्या ऑप्शनला क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो वेबसाईटवर अपडेट करावा लागेल.

Trending