आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vipul Sharma About Share Market Review In Marathi

बाजारातील घसरण अजूनही कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर बाजारात मंदीवाल्यांनी पुन्हा एकदा भूकंप आणला. यांच्याकडून निघालेल्या निर्देशांकाच्या सूचीमध्ये दोन सत्रांतील मोठा भाग गमावावा लागला. बेंचमार्क इंडेक्स जवळपास २.४ टक्के पडून बंद झाला. बाजारातील हे नकारात्मक परिणाम भूमी अधिग्रहण आणि कर सुधार विधेयकाला होत असलेल्या दिरंगाईमुळे होत आहेत. भूसंपादन विधेयक आणि वस्तू व सेवा सुधारणा कायदा (जीएसटी) वर विचार करण्यासाठी सरकार तयार झाले आहे, ज्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्ये आणखी उशीर होण्याची शंका निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे जीएसटी विधेयकाला उशीर झाला तर सरकार १ एप्रिल २०१६ पासून जीएसटी लागू करू शकत नाही, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नुकसान होईलच, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्येदेखील चुकीचा संदेश जाईल, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आधीच स्पष्ट केले आहे. वास्तविक बाजारातील हा नकारात्मक विचार आधीच सुरू आहे. विदेश गुंतवणूकदारांसाठी किमान कर (मॅट) लावणे, आगामी काळात कमी पावसाची शक्यता आणि कंपनीच्या फायद्याचे कमी होणारे प्रमाण यामुळे बाजार आधीच पडलेला आहे. एकंदरीतच देशातील शेअर बाजार कमजोर झाला आहे. जागतिक स्तरावर ग्रीसची संकटपूर्ण परिस्थिती आणि चीनचा कमी झालेला वेग यामुळे गुंतवणूकदार कोंडीत अडकले आहेत. चीनने गेल्या सहा महिन्यांत तिसऱ्यांदा भाव कमी केला आहे. हा अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्यासाठीचा आश्चर्याचा धक्का आहे. वास्तविक अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत बनली आहे. गेल्या शुक्रवारी रोजगाराबाबत मिळालेली आकडेवारी अमेरिकेची अर्थव्यवस्था वेग घेत असल्याचे संकेत देते. त्यातच फेडरल रिझर्व्हच्या अपेक्षेपेक्षा लवकर व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेला बळ मिळताना दिसत नाही. एकूणच, जगातील शेअर बाजाराची स्थिती सध्या चांगली नाही. आता सर्वांच्या नजरा ग्रीसवर आहेत. तिथे युराेपिय आणि जगातील बाजाराच्या पडझडीचा धोका कायम आहे. भारताचा विचार केला तर नकारात्मक विचारांमुळे शेअरबाजार कमजोर स्थितीत आहे. सध्या तरी काही सकारात्मक स्थिती दिसत नाही. विदेशी कंपन्यांनी गेल्या १५ सत्रांत दोन अरब डॉलरचे शेअर विकले आहेत. यात सन फार्माच्या शेअरमध्ये जपानी कंपनी दाईची सँक्योने केलेल्या ब्लॉकसेलचा समावेश नाही.
तांत्रिक बजारामध्येदेखील असाच ट्रेंड सुरू आहे. यात बाजार आणखी पडण्याची शक्यता आहे. निफ्टीला खाली ८०७८ अंकावर सहकार्य मिळू शकते. मात्र, हे मध्यम सहकार्य असेल. यानंतर ७९६१ जवळपास काही कालावधीसाठी, तर मोठे सहकार्य ७७२१ च्या जवळपास मिळू शकते. त्यातच निफ्टीला वरती पहिले सहकार्य ८१९१ अंकाच्या जवळपास मिळू शकते. हा एक मध्यम रेजिस्टन्स असेल. निफ्टीने हा स्तर पार केला तर पुढील रेझिस्टन्स ८३५५ च्या जवळपास मिळेल, ज्याचा परिणाम दिसून येईल. निफ्टी याच्या वर बंद झाला तर हे बाजारातील नकारात्मकता संपण्याचे संकेत असतील. शेअर बोर्डवर या आठवड्यात महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि एनडीटीव्ही लिमिटेड सुस्थितीत दिसून येत आहे. महिंद्रा अँड महिंद्राचा सध्याचा भाव १,१७७.१० इतका आहे, तर त्याचे लक्ष्य १,१९४ आणि स्टॉप लॉस १,१५४ रुपये आहे. एनडीटीव्हीचा सध्याचा भाव ११४.५५ रुपये आहे. त्याचे लक्ष्य ११७.५ रुपये आणि स्टॉप लॉस १०९ रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dbcorp.in