Home | Business | Share Market | vipul sharma article on share market

शेअर बाजारात मर्यादेतच व्यवहार होण्याची अपेक्षा

विपुल वर्मा | Update - Apr 20, 2017, 03:00 AM IST

जागतिक चिंता वाढल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारात सकारात्मक धारणा दिसून आली नाही. अमेरिकी आणि उत्तर काेरिया यांच्यादरम्यान असलेल्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. काहींनी तर याला दोन अणुशक्तीने संपन्न देशांदरम्यान युद्धाचे संकेत मानले आहेत.

 • vipul sharma article on share market
  जागतिक चिंता वाढल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारात सकारात्मक धारणा दिसून आली नाही. अमेरिकी आणि उत्तर काेरिया यांच्यादरम्यान असलेल्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. काहींनी तर याला दोन अणुशक्तीने संपन्न देशांदरम्यान युद्धाचे संकेत मानले आहेत.
  कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत असल्यामुळेदेखील बाजाराच्या धारणेवर परिणाम होत आहे. इन्फोसिसच्या आकडेवारीमुळे निराशा वाढली आहे. आठ नोव्हेंबर रोजी झालेल्या नोटाबंदीनंतर नगदीची कमतरता असलेल्या तिमाहीमध्ये कंपन्यांची चांगली आकडेवारी आल्यामुळे सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
  कंपन्यांची तिमाही आकडेवारी आल्यानंतर बाजारात पुन्हा एकदा तेजी नोंदवण्यात येणार असल्याची तज्ज्ञांना अपेक्षा होती. मात्र, बाजार सध्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आतापर्यंत जाहीर झालेले सर्व कंपन्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणेच आहेत. यासंदर्भात येत्या काळात चित्र आणखी स्पष्ट होईल.

  किरकोळ महागाई दरात वाढ नोंदवण्यात आली असून ही चिंताजनक बाब आहे, तर घाऊक महागाई दरात अपेक्षेपेक्षा जास्त घसरण झाल्याने बाजार याकडे सकारात्मक दृष्टीने पाहील. असे असले तरी फेब्रुवारी महिन्यात औद्योगिक उत्पादनात वाढीची गती १.२ टक्क्यांनी घसरली असून यामुळेही चिंता वाढली आहे. एकंदरीत शेअर बाजारात संमिश्र धारणा असून लक्षपूर्वक विचार केल्यास बाजार मर्यादेत राहून नीचांकी पातळीवरच व्यवहार सुरू राहण्याची शक्यता आहे.
  जागतिक पातळीवर अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यादरम्यान तणाव वाढत आहे. जर युद्ध झाले तर त्याचे दुष्परिणामही सोबत येतील आणि यामुळे शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. या भूराजकीय संकटाव्यतिरिक्त अमेरिकी कंपन्यांची आकडेवारीदेखील विशेष चांगली आलेली नाही. कमजोर आकडेवारी जाहीर करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत गोल्डमॅन साक्स आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांच्या नावांचाही समावेश आहे.

  या कंपन्यांची आकडेवारीदेखील अपेक्षेपक्षा खराब आली आहे. वरवर पाहिले तर जागतिक धारणा प्रतीक्षा करण्याच्या तयारीत असून जागतिक पातळीवर कन्सॉलिडेशन दिसून येईल.
  एनएसईमधील निफ्टीदेखील कन्सॉलिडेशनच्या स्थितीत आहे. येत्या काळात हा मर्यादेत फिरत राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी सध्या हा आपल्या उच्चांकी पातळीवर पोहोचला असून चार्टमध्ये काही प्रमाणात कमजोरी येणार असल्याचे संकेत देत आहे. मंगळवारी निफ्टी ३४.१५ अंकाच्या घसरणीसह ९१०५.१५ या पातळीवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास घसरणीत याला ९०२१ च्या जवळपास आधार मिळेल. हा मजबूत आणि महत्त्वपूर्ण आधार असेल. या पातळीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. जर निफ्टी या पातळीच्या खाली आला तर यात आणखी घसरण येण्याची शक्यता आहे. या आठवड्यात निफ्टी ९०२१ ते ९२१९ या मर्यादेत फिरत राहण्याची शक्यता आहे. या दोन्हीपैकी कोणत्याही दिशेला निफ्टी गेल्यास त्याची धारणा निश्चित होईल.
  शेअरमध्ये या आठवड्यात एचडीएफसी बँक १,४४७.३० रुपयांच्या सध्याच्या भावासह चांगल्या स्थितीत दिसत आहे. हा १,४६४ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो. घसरणीत याला १,४३२ रुपयांवर स्टॉपलॉस लावावा, तर लार्सन अँड टूब्रो १,६६९.५० रुपयांच्या सध्याच्या बंद भावावर कमजोर दिसत आहे. हा १,६४१ रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. तेजी आल्यास याला १,६९१ रुपयांवर रेझिस्टन्स आहे.

  { लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत.
  vipul.verma@dbcorp.in

Trending